शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या विरोधात बैलबंडी मोर्चा

By admin | Updated: May 15, 2016 01:43 IST

वनविभागाच्यावतीने शेतकऱ्यांवर होत असलेल्या अतिरेकी कारवाईच्या विरोधात बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.

शेतकऱ्यांमध्ये असंतोष : अतिरेकी कारवायांचा विरोध, बंड्याही केल्या जातात जप्तदेवळी : वनविभागाच्यावतीने शेतकऱ्यांवर होत असलेल्या अतिरेकी कारवाईच्या विरोधात बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. सत्तारूढ पक्षाचे असल्याची तमा न बाळगता खासदार रामदास तडस यांनीही शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभाग घेतल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार तेजस्विनी जाधव, वनविभागाचे सहायक वनसंरक्षक शरद करे यांना देण्यात आले.मोर्चात देवळी व परिसरातील शेतकरी आपल्या बैलबंड्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध असो, शेतकऱ्यांवर लादलेले खटले मागे घ्या, दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करा आदी मागण्यांचा जयघोष करीत शहराच्या मुख्य मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला. मिरणनाथ मंदिर प्रांगणातून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. शेतकऱ्यांमध्ये असलेली अन्यायाची भावना व रोष पाहता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होतो. कॉग्रेसच्या तालमीत वाढलेल्या वनविभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनाचा खेळखंडोबा लावला आहे. वन्यजीव प्राण्यांबाबत पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना कारागृहात डांबले जात आहे, असे मत खा. तडस यांनी बैलबंडी मोर्चाला संबोधित करताना व्यक्त केले.जंगल परिसरातील नीलगाय, रानडुक्कर व अन्य वन्यप्राण्यांच्या मृत्यू प्रकरणी शेतकऱ्यांना दोषी ठरविले जात आहे. त्यांना अटक करून कारागृहात डांबले जात आहे. हा सर्व प्रकार निंदनीय आहे. या प्रकरणात संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी. शेतकऱ्यांवर लादलेले खटले मागे घेण्यात यावे. जप्त केलेल्या बैलबंड्या परत करण्यात याव्या, आदी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा खा. तडस यांनी पुनरूच्चार केला. आठ दिवसांत या मागण्या पूर्ण न झाल्यास जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.वनविभागाकडून करण्यात येत असलेल्या अतिरेकी कारवाईमुळे शेती करावी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. वन्य प्राण्यांना मारण्याची परवानगी दिली असताना गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केले जातात. शिवाय वन विभागाच्या हद्दीत आढळल्यासही कारवाई केली जाते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. वन विभागाकडून गुन्हे दाखल करून खटले भरले जात असल्याने शेतकऱ्यांनी शेती करायची की कोट-कचेरीच्या चकरा मारायच्या, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यात शेतकऱ्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो.याबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने एसडीओ स्मीता पाटील, तहसीलदार तेजस्विनी जाधव, वनविभागाचे सहायक वनसंरक्षक शरद करे यांना निवेदन सादर केले. शिष्टमंडळात न.प. सभापती विलास जोशी, जि.प. सदस्य मिलिंद भेंडे, न.प. सदस्य कृष्णकांत शेंडे, दिलीप कारोटकर, तालुका शिवसेनाप्रमुख महेश जोशी, अब्दुल नईम, गिरीश काशीकर यांचा समावेश होता. पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी बंदोबस्त ठेवला. मोर्चाला शरद आदमने, उदय काशीकर, भाजपाचे शहर अध्यक्ष किरण तेलरांधे, विजय बिजवार, वसंत ठाकरे, किसना कामडी, संजय ढोबळे व शेतकऱ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)खा. तडस यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारल्यानंतर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक करे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला टोलवाटोलवीचे उत्तरे दिली. जप्त केलेली बैलबंडी सोडण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. न्यायालयाचा आदेश आणल्यानंतरच पूढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्यांच्या या अरेरावीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.