वाईट प्रवृत्तीचे दहन करणारी ‘मारबत’ ठरली लक्षवेधक
By Admin | Updated: September 4, 2016 00:34 IST2016-09-04T00:34:56+5:302016-09-04T00:34:56+5:30
पोळ्याचा करीचा दिवस म्हणजे तान्हा पोळा! या दिवशी दरवर्षी सकाळी गावातून मारबत काढण्याची परंपरा स्थानिक घुबडटोली परिसरात आजही जोपासली जात आहे.

वाईट प्रवृत्तीचे दहन करणारी ‘मारबत’ ठरली लक्षवेधक
घुबडटोली परिसरातील परंपरा कायम : गावाच्या शिवेवर जाळल्या जातात मेढ्या
पुलगाव : पोळ्याचा करीचा दिवस म्हणजे तान्हा पोळा! या दिवशी दरवर्षी सकाळी गावातून मारबत काढण्याची परंपरा स्थानिक घुबडटोली परिसरात आजही जोपासली जात आहे. पिवळ्या मारबतीसह गावातील मेढ्या गोळा करून गावाच्या शिवेवर जाळल्या जातात. गावातील रोगराई, माशा-कुशा, महागाई आदी वाईट बाबींचे दहन केले जाते. पर्यायाने मानवी हृदयात असणाऱ्या वाईट प्रवृत्तीचे दहन केले जाते. पोळ्याचे औचित्य साधून शुक्रवारी सकाळी घुबडटोली भागातून निघालेली पिवळी मारबत लक्षवेधक ठरली.
एका ट्रालीवर डीजे, तालावर नाचणाऱ्या गौळणी, गावातील मेढ्या गाळा केलेल्या ट्राल्या, हजारो नागरिकांचा सहभाग आणि सर्वात शेवटी वाईट प्रवृत्तीचे प्रतिक असलेली पिवळी मारबत, असा भव्य ताफा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत असताना पुलगावकरांचे लक्ष वेधत होता. नागरिकांनी आपल्या परिसरातील मेढ्या एकत्र करून ठेवल्या व कार्यकर्ते त्या ट्रालीत जमा करीत होते. मागील अनेक वर्षांपासून घुबडटोली परिसरातील नगरसेवक सुनील ब्राह्मणकर, विलास गाधने, नंदू काळसर्पे, विजय डुकरे, शेखर काळसर्पे यांच्यासह घुबडटोली परिसरातील मंडळी या परंपरेची शांततामय व धार्मिक सदभाव राखून जोपासना करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)