रक्तदान व वृक्षारोपणाने रविवारी बाबूजींना आदरांजली
By Admin | Updated: July 1, 2017 00:33 IST2017-07-01T00:33:13+5:302017-07-01T00:33:13+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त

रक्तदान व वृक्षारोपणाने रविवारी बाबूजींना आदरांजली
लोकमत व युवा सोशल फोरमचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दि. २ जुलैला वर्धेत रक्तदान शिबिरासह वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत जिल्हा कार्यालय आणि युवा सोशल फोरमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शहरातील विविध सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थाही सहभागी होत आहेत. २ जुलैला सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत स्व. बाबूजींच्या प्रतिमेपुढे पुष्पाजंली अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरुवात होईल.
या शिबिरासाठी वेळेवरही उपस्थित राहून रक्तदान करता येणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी करण्याची गरज नाही. या शिबिरामध्ये रक्तदान करुन रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, अशी विनंती युवा सोशल फोरमचे सुधीर पांगुळ आणि वर्धा लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी किशोर मानकर ९६५७८८७११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
रक्तदात्यांना मिळणार प्रमाणपत्र व कार्ड
युवा सोशल फोरमच्या सहायाने होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र, ब्लड डोनर कार्ड दिले जाणार आहे. या कार्डच्या माध्यमातून रक्ताची गरज पडल्यास रुग्णालयाशी संपर्क साधू शकतात.
वृक्षारोपण
स्व. बाबुजींच्या जयंती निमित्त वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सहकार्याने पिपरी (मेघे) येथील हनुमान टेकडीवर वृक्षारोपणही करण्यात येणार आहे.