बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालचा सहभाग
By Admin | Updated: January 1, 2016 03:23 IST2016-01-01T03:23:44+5:302016-01-01T03:23:44+5:30
‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकारामुळे शहरातील सामाजिक संघटनांसह आता महाविद्यालयेही नो व्हेईकल डे मध्ये सहभागी होऊ लागली

बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालचा सहभाग
‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकारामुळे शहरातील सामाजिक संघटनांसह आता महाविद्यालयेही नो व्हेईकल डे मध्ये सहभागी होऊ लागली आहेत. दुसऱ्या गुरूवारी सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. सदर महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास शहरातील दादाजी धुनिवाले मठ चौकात गोळा होत तेथून सायकलने महाविद्यालय गाठले.
सायकलने महाविद्यालयात जात असताना सदर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी जबाबदारी समजून नागरिकांमध्येही नो व्हेईकल डे आणि एक दिवस वाहने न वापरल्यास होणाऱ्या फायद्यांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या सायकल यात्रेत महिला प्राध्यापकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरला.