विविध संघटनांकडून ‘नो व्हेईकल’ची जागृती

By Admin | Updated: February 12, 2016 02:36 IST2016-02-12T02:36:25+5:302016-02-12T02:36:25+5:30

शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, रोटरी क्लब, शासकीय कर्मचारी, अधिकारी व नागरिकाद्वारे गुरूवारी ‘नो व्हेईकल डे’निमित्त रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

Awareness of 'No Vehicle' from various organizations | विविध संघटनांकडून ‘नो व्हेईकल’ची जागृती

विविध संघटनांकडून ‘नो व्हेईकल’ची जागृती

हिंगणघाट : शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, रोटरी क्लब, शासकीय कर्मचारी, अधिकारी व नागरिकाद्वारे गुरूवारी ‘नो व्हेईकल डे’निमित्त रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
गोकुलधाम मैदानावरून निघून रॅली तुकडोजी पुतळा चौक, कारंजा चौक, सुभाष पुतळा, विठोबा चौक, बसस्थानक, झांसी राणी चौक, पोथरा कॉलनी मार्गे गोकुलधाम मैदानावर परतली. रॅलीला आमदार समीर कुणावार यांनी हिरवी झेंडी दाखविली. रॅलीत तहसीलदार दीपक करंडे, नायब तहसीलदार अरविंद हिंगे, अन्नपुरवठा निरीक्षक गजानन टेकाडे, तालुका कृषी अधिकारी संजय साखरे, भारतीय माजी सैनिक संघाचे पुंडलिक बकाने, प्रवीण हेलवणकर, सुधाकर दांडेकर, महेंद्र लाखे, दिलीप वाघमारे, अशोक तडस, तुळशीदास पटले, नितीन वाघमारे, सुधाकर जामकुटे, रोटरीचे डॉ. अशोक मुखी, डॉ. सतीश डांगरे, डॉ. संदीप मुडे, मुरली लाहोटी, किरण गहेरवार, राम पोकले, सुरेश चौधरी, केशव तितरे, रूपेश लाजुरकर, सुनील पिंपळकर, गणेश उगे, प्रभाकर मुंगले, गणेश मुंगले, प्रशांत भेदुरकर, सतीश कावळे, स्वप्निल बाराहाते, श्याम गावंडे, अजय मुडे, पंकज भोंगाडे, अरुण घोटेकार, सुरेंद्र अनकर, जगदीश वांदिले, प्रीतम कुंभारे, मुकूंद मुंधडा, विनय मुडे, हुरकर, मोहता, डेहने, खोडे आदी सहभागी होते. उपस्थितांनी नारे देत प्रदूषणाबाबत जनजागृती केली व ‘नो व्हेईकल डे’चे महत्त्व विषद केले.(तालुका प्रतिनिधी)

वर्धेत वैद्यकीय मंचाकडून घरोघरी जागर
वर्धा : लोकमत इनिशिएटीव्ह नो व्हेईकल डेच्या जनजागृतीकरिता वैद्यकीय जनजागृती मंचाने जागर मोहीमच हाती घेतली आहे. गुरूवारी सकाळी ७ वाजता सुभाष चौक गोंडप्लॉट येथे सायकल रॅलीला १०५ वर्षीय मोरश्वरराव सोमनकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. यानंतर नवभारत विद्यालयासह विविध चौकांत जागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यात डॉ. प्रशांत वाडीभस्मे, अखिलेश कोटंबकर, सुरेश ठाकरे, डॉ. सचिन पावडे, श्याम भेंडे, डॉ. राजेश सरोदे, डॉ. आलोक विश्वास, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. आनंद गाढवकर, डॉ. निखील ताल्हण, डॉ. अरविंद वंजारी, विलास भरडे, अमोल देशमुख, पवन बोधनकर, अतूल तराळे, सुरेश ठाकरे, गजानन गावंडे आदींचा सहभाग होता.

Web Title: Awareness of 'No Vehicle' from various organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.