चित्ररथातून स्वाईन फ्लू आजाराबाबत जागृती
By Admin | Updated: March 26, 2015 01:50 IST2015-03-26T01:50:53+5:302015-03-26T01:50:53+5:30
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाअंतर्गत गावांमध्ये स्वाईन फ्लू आजाराबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहेत.

चित्ररथातून स्वाईन फ्लू आजाराबाबत जागृती
सेलू : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाअंतर्गत गावांमध्ये स्वाईन फ्लू आजाराबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहेत. या अभियानचा प्रारंभ चित्ररथास पं.स. सभापती मंजुषा दुधबडे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य अशोक कलोडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण धमाने, बुंदीले, सातघरे, आरोग्य विस्तार अधिकारी थुल, आरोग्यसेवक व सेविका, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांमध्ये जागृती करण्याबाबत निर्देश करण्यात आले.
या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांत स्वाईन फ्लू आजाराबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येत आहेत. स्वाईन फ्लू आजाराची लागण टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, आजाराची लक्षणे व उपचाराबाबात संदेश देण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक गावात आशा सेविका व विद्यार्थ्यांनी रॅली काढून जागृती केली.(तालुका प्रतिनिधी)