‘मुद्रा लोन’चे फॉर्म देण्यासाठी बँकांची टाळाटाळ
By Admin | Updated: June 19, 2016 01:56 IST2016-06-19T01:56:09+5:302016-06-19T01:56:09+5:30
बेरोजगारांना बँकेतून लोन घेऊन स्वयंरोजगार सुरू करता यावा यासाठी केंद्र शासनाद्वारे ‘मुद्रा लोन’ही योजना सुरू करण्यात आली.

‘मुद्रा लोन’चे फॉर्म देण्यासाठी बँकांची टाळाटाळ
जिल्हाधिकाऱ्यांकडे तकार : भाजयुमो शिष्टमंडळाची चर्चा
वर्धा : बेरोजगारांना बँकेतून लोन घेऊन स्वयंरोजगार सुरू करता यावा यासाठी केंद्र शासनाद्वारे ‘मुद्रा लोन’ही योजना सुरू करण्यात आली. परंतु बँका या योजनेचे फॉर्म देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे ही टाळाटाळ थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी निवेदनातून करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणांना उद्योग उभारता यावे यासाठी महत्वाकांक्षी अशी ‘मुद्रा लोन’ योजना जाहीर केली. तरूणांनी नोकरीपेक्षा व्यवसाय, उद्योग उभारून अनेक तरूणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा व देशातील बेरोजगारीला आळा बसावा, स्वकल्पनेचा बळावर नवीन उद्योग व्यवसाय उभारून देशाच्या विकासात हातभार लावावा या हेतूने सदर योजना सुरू करण्यात आली. केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असलेल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकामार्फत १० लाखापर्यंत कोणतेही तारण न घेता कर्ज पुरवठा करण्याची ही योजना अल्प काळात लोकप्रिय झाली. परंतु चालू आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये आजपर्यंत कोणत्याही बँकेने लाभार्थीला मुद्रा योजनेचा लाभ दिलेला नाही. किंबहुना कर्ज योजनेचा फार्म देण्याससुद्धा सर्व बँका टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत बँकांना समज देऊन ‘मुद्रा लोर्न’ फॉर्म वाटप सुरू करण्यासंदर्भात निर्देश द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.
निवेदन देताना शिष्टमंडळात भाजपा शहर सरचिटणीस निलेश पोहेकर, भाजयुमो जिल्हा महामंत्री वरूण पाठक, आकाश चौधरी, सचिन गहलोत, आकाश नारळकर, रोहन बत्रा, अश्वीन खंडारे, अनिल डोंगरे, आशिष वरघणे, दीपक भुतडा, शार्दुल वांदिले, राकेश मंशानी, प्रणव किटे, तिवारी, वैभव तडस, रजत बत्रा आदींचा सहाभाग होता.(शहर प्रतिनिधी)