‘भूमिगत’च्या कामांची माहिती देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:25+5:30
भूमिगत गटार योजनेची कामे तसेच पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. मात्र, शहरातील पक्के रस्ते फोडून तसेच कोणतीही पूर्वसूचना न देताच रस्तो फोडल्याने गांधी जिल्ह्याला विद्रुप करण्याचे काम न.प.ने केले आहे. ताराचंद चौबे यांनी सहा महिन्यांपूर्वी शहरातील भूमिगतच्या कामाची संपूर्ण माहिती आरटीआयच्या अर्जाद्वारे मागितली होती. मात्र, अद्यापही माहिती न.प.ने दिली नसल्याने कामात गैरप्रकार झाल्याचा संशय बळावत आहे.

‘भूमिगत’च्या कामांची माहिती देण्यास टाळाटाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात मागील दोन वर्षांपूर्वीपासून सुरु झालेल्या भूमिगतच्या कामांची संपूर्ण माहिती आरटीआय कार्यकर्ता ताराचंद चौबे यांनी न.प.कडे मागितली. मात्र, आज सहा महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने न.प.च्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. भूमिगतच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चौबे यांनी केला आहे.
भूमिगत गटार योजनेची कामे तसेच पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. मात्र, शहरातील पक्के रस्ते फोडून तसेच कोणतीही पूर्वसूचना न देताच रस्तो फोडल्याने गांधी जिल्ह्याला विद्रुप करण्याचे काम न.प.ने केले आहे. ताराचंद चौबे यांनी सहा महिन्यांपूर्वी शहरातील भूमिगतच्या कामाची संपूर्ण माहिती आरटीआयच्या अर्जाद्वारे मागितली होती. मात्र, अद्यापही माहिती न.प.ने दिली नसल्याने कामात गैरप्रकार झाल्याचा संशय बळावत आहे. चौबे हे दररोज न.प.चे उंबरठे झिजवत माहिती मागण्यास जात असून त्यांना कोरोनाचे काम आहे, असे उत्तर देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येते. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनाही तक्रार दिली. पण, तरीदेखील याची दखल घेण्यात आली नाही. शहरातील आंबेडकर पुतळा ते बजाज चौक, शिवाजी चौक ते आर्वी नाका तसेच कारागृहासमोरील नवीन रस्ता बांधकाम होवून १० वर्षेही नाही उलटले तोच पुन्हा रस्ता फोडण्यात आला असून सामान्य नागरिकांचे कोटी रुपयांचे नुकसान नगरपालिका करीत आहे. चांगले रस्ते मधातून फोडून ते तसेच ठेवत आहे. रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाला रस्ते दुरुस्त करण्यास सांगितले असता त्यांच्याकडून आम्हला परमीशन नसल्याचे उत्तर मिळते. रस्ता खोदकामामुळे बिएसएनएलचे केबल आणि नगरपालिकेचे पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटत असून याकडे कुणाचेही लक्ष नाही. यासंपूर्ण विद्रुपीकरणारा नगरपालिका जबाबदार असून दोषी विभागावर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच बजाज चौकातील उड्डाणपूलाचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून पूर्णच झाले नसून या मार्गावरील समस्या जैसे थेच आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असुन कोटी रुपये पाण्यात गेले आहे. याकडे मात्र, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ता ताराचंद चौबे यांनी केली आहे.
अनेकांचे अपघात दुचाकींचे पार्ट खिळखिळे
शहरात दोन वर्षांपूर्वी भूमिगतच्या कामांना सुरुवात करण्यात आली. यामध्ये गटार योजना आणि नळ योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु केले. यासाठी शहरातील चांगल्या दर्जाचे रस्ते मधातून फोडण्यात आले. खोदलेली माती रस्त्यावरच पसरविल्यामुळे अनेकांचे अपघात झाले असून खडतर रस्त्याने प्रवास सुरु असल्याने अनेकांच्या दुचाकींचे पार्ट्स खिळखिळे झाले आहे.