पोटनिवडणुकीची माहिती ग्रामपंचायतला देण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: June 24, 2014 00:00 IST2014-06-24T00:00:34+5:302014-06-24T00:00:34+5:30
ग्रामपंचायत आनंदवाडी येथील पोटनिवडणुकी संदर्भात तलाठ्याने कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे गावाकऱ्यांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या प्रकरणी गावकऱ्यांनी

पोटनिवडणुकीची माहिती ग्रामपंचायतला देण्यास टाळाटाळ
आष्टी(शहीद) : ग्रामपंचायत आनंदवाडी येथील पोटनिवडणुकी संदर्भात तलाठ्याने कुठलीच माहिती दिली नाही. त्यामुळे गावाकऱ्यांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या प्रकरणी गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
तालुक्यात विविध ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यानंतर पोटनिवडणुका संदर्भात कार्यक्रम जाहीर झाला. यात ग्रामपंचायत आनंदवाडीचा समावेश होता. निवडणुकीची माहिती दहा दिवसांच्यापूर्वी ग्रामपंचायतीला तहसील कार्यालयाकडून मिळणे अपेक्षित आहे. त्यासासाठी संबंधीत गावाच्या तलाठ्याकडे काम सोपविण्यात आले होते; मात्र येथील तलाठी रजेवर गेले. ते रजेवर असल्याने त्यांचा प्रभार असलेल्या तलाठ्याने ती माहिती गावाकऱ्यांना देणे आवश्यक होते. वास्तविकतेत मात्र तहसीलदारांनी येथील प्रभार कोणत्याही तलाठ्याला दिला नसल्याचे समोर असले. शासनाच्या या दप्तरदिरंगाईचा फटका आनंदवाडी येथील गावकऱ्यांना बसल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणी सुनील भार्गव, अनंत खोरगडे, ज्ञानेश्वर वानखडे यांच्यासह गावकऱ्यांनी या प्रकरणाला तलाठीच जबाबदार असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. निवडणुकीसारख्या संवेदनशील विषायात तलाठ्याकडून ढवळाढवळ केल्या जात असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
येथील तलाठी रजेवर असल्याचा अर्ज प्रभारी तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे दिला होता. चव्हाण यांनी येथील तात्पुरता कार्यभार दुसऱ्या तलाठ्याकडे द्यावा असे सांगितले; मात्र त्याची आॅर्डर निघाली नाही. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आनंदवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)