आॅटोचालक ‘सतीश’ ठरतोय खरा स्वच्छतादूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:43 IST2018-12-24T22:43:00+5:302018-12-24T22:43:29+5:30

वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेवून स्थानिक सतीश तडस नामक तरुण शहरात सध्या स्वच्छतेची विविध कामे करीत आहे. त्याचे हे कार्य इतरांना प्रेरणा देणारे ठरत आहे. विशेष म्हणजे सतीश हा आॅटो चालक आहे.

Authentic 'Satish' is the true cleanman | आॅटोचालक ‘सतीश’ ठरतोय खरा स्वच्छतादूत

आॅटोचालक ‘सतीश’ ठरतोय खरा स्वच्छतादूत

ठळक मुद्देदररोज करतोय वडगावचे प्रसाधनगृह स्वच्छ

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेवून स्थानिक सतीश तडस नामक तरुण शहरात सध्या स्वच्छतेची विविध कामे करीत आहे. त्याचे हे कार्य इतरांना प्रेरणा देणारे ठरत आहे. विशेष म्हणजे सतीश हा आॅटो चालक आहे.
गेल्या वर्षभऱ्यापासून बस स्थानक भागातील वडगाव रस्त्यावरील प्रसाधानगृह तो प्रत्येक दिवशी स्वच्छ करतो. इतकेच नव्हे तर प्रसाधनगृह स्वच्छ करण्यासाठी लागणारे विविध साहित्य तो स्वत:च खरेदी करून आणतो. त्याचे हे कार्य मागील काही वर्षांपासून सेवाभावी उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून सुरू असल्याचे तो सांगतो. सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागृती केली जात आहे. त्यातच स्वच्छतेचा संदेश देणाºया या तरुणाचे कार्य स्वत:ला समाजसेवक तसेच लोकप्रतिनिधी म्हणून मिरविणाºया कामचुकारांना चपराक देणारे ठरत आहे. सतीश हा नियमित न चुकता वडगाव येथील प्रसाधनगृहाची स्वच्छता जंतुनाशक टाकून करतो. सतीशच्या कार्याची दखल घेवून काही सामाजिक संघटनांनी त्याचा सत्कार केल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी सदर प्रसाधनगृहावरील पाण्याची टाकी फुटली. त्यावेळी त्यानेच पुढाकार घेत तेथे दुसरी टाकी बसवून घेतली.

सदर काम सामाजिक दायित्व म्हणून करीत असल्याने मला काम करताना किळस वाटत नाही. उलट सदर कामातून मानसिक समाधान मिळते.
- सतीश तडस, तरुण, सेलू.

Web Title: Authentic 'Satish' is the true cleanman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.