Attempts to find escape in fear of defeat | पराभवाच्या भीतीने पळवाटा शोधण्याचा प्रयत्न
पराभवाच्या भीतीने पळवाटा शोधण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देविजय जयस्वाल : शेखर शेेंडे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सचिव शेखर शेंडे यांनी नुकताच माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांच्या समर्थकांचे काँग्रेसने राजीनामे घ्यावे अन्यथा निवडणूक लढणार नाही. तसेच कांबळे समर्थक असलेले सेलू तालुका काँग्रेस अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय उर्फ पप्पू जयस्वाल यांनी मागील निवडणुकीत व आताही विरोधात प्रचार करणार असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप निरर्थक असून शेखर शेेंडे यांच्या डोळ्यापुढे पराभव दिसू लागल्याने त्यांनी निवडणूकीच्या रिंगणातून पळवाटा शोधण्यासाठी हा खटाटोप चालविला, असे प्रत्युत्तर जि.प. चे माजी अध्यक्ष तथा सेलू तालुका कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय जयस्वाल यांनी दिले आहे.
शेखर शेंडे हे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असताना आमदार रणजीत कांबळे यांनी शेंडे यांना निवडून आणण्याकरिता सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले. सेलू तालुकाध्यक्ष म्हणून सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जाहीररित्या शेखर शेंडे यांना समर्थन देऊन गावागावात जाऊन प्रचार करित मताधिक्य दिले तरीही असे आरोप करीत ते आपल्या आकसबुद्धीचा परिचय करुन देत आहे.
काँग्रेस पक्षात काम करीत असताना वरिष्ठांच्या ध्येय धोरणानुसार गेल्या कित्येक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करीत असताना शेखर शेंडे विनाकारक आकसातून निराधार आरोप करतात. वास्तविकत: शेेंडे यांच्या निष्क्रीयतेमुळे व कार्यकर्त्यांमधील दुफळी माजविण्याच्या स्वभामुळेच त्यांना दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत माघार घ्यायची आहे, असे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांनी आरोप न करता बिनशर्त माघार घ्यावी, असेही जयस्वाल म्हणाले.


Web Title: Attempts to find escape in fear of defeat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.