हिंगणघाटमधील पोलिस कर्मचाऱ्याचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 15:45 IST2020-08-13T15:44:45+5:302020-08-13T15:45:25+5:30
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी केतन बावणे याने बुधवारी रात्री आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला होता.

हिंगणघाटमधील पोलिस कर्मचाऱ्याचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
ठळक मुद्दे ठाणेदाराच्या त्रासाला कंटाळून पाऊल उचलले असल्याचा पत्नीचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील हिंगणघाट पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी केतन बावणे याने बुधवारी रात्री आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
मात्र केतन बावणे या पोलीस कर्मचाऱ्याला ठाणेदार हे वेळोवेळी त्रास देत होते त्यामुळे त्याने ठाणेदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नी आस्था बावणे हिने केला आहे.