शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हल्लाबोल पदयात्रा मतदानासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 19:59 IST

वर्धा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही हल्लाबोल पदयात्रा मतदानासाठी नाही तर राज्यातील सर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध असून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्धा जिल्ह्यातील शिरपूर गावात झालेल्या सभेत दिला.

वर्धा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही हल्लाबोल पदयात्रा मतदानासाठी नाही तर राज्यातील सर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध असून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्धा जिल्ह्यातील शिरपूर गावात झालेल्या सभेत दिला.तिसऱ्या दिवशी पदयात्रा वर्धा जिल्हयात पोहोचली त्यावेळी शिरपूर गावामध्ये सभा झाली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारच्या काळात ७० हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली, ती सुद्धा कोणताही कागद भरून न घेता. परंतु या भाजपा सरकारने ऑनलाइनच्या नावाखाली लोकांना खेपा मारायला भाग पाडले आहे. हे सरकार खोटं बोलते पण रेटून बोलते, त्यामुळे मी या सरकारला खोटारडे सरकार असे नाव दिल्याचे सांगितले.सभेला मोठया प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता. शिवाय अंगणवाडी सेविका संघटनाही उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करेल.आमच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी विधानसभेत आणि विधानपरिषदेमध्ये सरकारला धारेवर धरतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे पाठीशी राहील, असेही स्पष्ट केले. दरम्यान, खोटारडया सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्याविरोधात नागपूरवर महिलांच्यावतीने लाटणे मोर्चा काढणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, वर्धाचे माजी आमदार सुरेश देशमुख, युवक प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, महिला जिल्हाध्यक्ष शरयू वांदिले, प्रवक्ते महेश तपासे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, महिला जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत, मनिषा मोटे आदींसह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस