शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कापूस पिकावर 'मर' रोगाचा 'अटॅक'; शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:21 IST

Vardha : जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडून आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : परिस्थितीत अनेक ठिकाणी अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर (पॅरा वील्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही विकृती पीक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेली असताना अधिक प्रमाणात दिसून येते.

पावसाच्या मोठ्या खंडामुळे कपाशी पिकाला पावसाचा ताण बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेली जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. यासाठी शेतकऱ्यांनी आकस्मिक मर रोगाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तजेलदारपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तसेच सुकल्यासारखे दिसते. त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने, फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळी पडतात. तसेच पात्या, फुले व अपरिपक्व बाँडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मुळे कुजत नाहीत. रोगग्रस्त झाडाला हमखास नवीन फूट येते. त्यामुळे या रोगाचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले. 

कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करा कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १० ग्रॅम अधिक युरिया २०० ग्रॅम १० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रति झाड २५० ते ५०० मिली द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी करावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी २ टक्के डीएपी २०० ग्रॅम १० लिटर पाण्यात आळवणी करून लगेच हलके पाणी द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

मर रोगाबाबत उपाययोजना...कापूस पिकाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पाणी द्यावे. पिकाला प्रदीर्घ पाण्याचा ताण पडू देऊ नये. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी व साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे. शेतातील पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आकस्मिक मर या विकृतीची लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी खालीलपैकी आळवणी करावी.

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा