झाड तोडण्याच्या वादातून अत्रे महाराजांना मारहाण

By Admin | Updated: June 26, 2015 02:02 IST2015-06-26T02:02:49+5:302015-06-26T02:02:49+5:30

सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मानव सेवाग्राम ध्यान साधना मंदिराचे व्यवस्थापक अत्रे महाराज यांना झाडांच्या फांदी ....

Atre kills the Mahar of Maharaj by breaking the tree | झाड तोडण्याच्या वादातून अत्रे महाराजांना मारहाण

झाड तोडण्याच्या वादातून अत्रे महाराजांना मारहाण

तिघे पोलिसांच्या ताब्यात
तळेगाव (श्यामजीपंत) : सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मानव सेवाग्राम ध्यान साधना मंदिराचे व्यवस्थापक अत्रे महाराज यांना झाडांच्या फांदी तोडण्यावरून वादात बाहुबली हनुमान मंदिराची देखरेख करणाऱ्या मेघराज नामदेव धोटे याने मारहाण केली. या प्रकरणी तळेगाव पोलिसात केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. तर अत्रे महाराजांवर उपचार सुरू आहे. बुधवारी घडलेल्या या घटनेचा तपास पोलीस करीत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी नामदेव धोटे यांच्या शेतात पुरातन बाहुबली हनुमान मंदिर आहे. त्याच मंदिराच्या शेजारी मानव सेवाश्रम ध्यान साधना मंदिर आहे. या साधना मंदिराचे व्यवस्थापक व बाहुबली मंदिराचा देखरेख यांच्यामध्ये गत दोन वर्षांपासून रस्त्यावरुन वाद सुरू आहे. अशातच शुक्रवारी (दि. २४) विजेच्या तारेवर झाडाचा फांदा पडला. तो फांदा तोडण्यासाठी अत्रे झाडावर चढविले. यावरून मेघराज धोटे आणि अत्रे महाराज यांच्यामध्ये वाद झाला. यामध्ये मेघराज याने अत्रे महाराज यांना दगडाने मारहाण करुन जखमी केले.
या प्रकरणी अत्रे यांनी तळेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून मेघराज धोटेसह नामदेव धोटे, कमला धोटे यांच्या विरूद्ध ३२५,५०४,५०६ अधिक ३८ गुन्हा दाखल केला. या तिघांना तळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. अत्रे महाराज यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकराणाचा तपास विनायक धावट करीत आहेत. या प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण असून प्रकरणाचा तपास लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)

Web Title: Atre kills the Mahar of Maharaj by breaking the tree