‘कही गम कही खुशी’चे वातावरण
By Admin | Updated: August 21, 2015 02:26 IST2015-08-21T02:26:09+5:302015-08-21T02:26:09+5:30
जिल्ह्यातील सेलू, समूद्रपूर, कारंजा (घाडगे) व आष्टी (शहीद) येथील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत झाले.

‘कही गम कही खुशी’चे वातावरण
ईश्वर चिठ्ठीचा वापर : चारही नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत
वर्धा : जिल्ह्यातील सेलू, समूद्रपूर, कारंजा (घाडगे) व आष्टी (शहीद) येथील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत झाले. यामुळे येथील ग्रामपंचायत बर्खास्त करण्यात आले होते. परिणामी येथील व्यवस्था विस्कळीत झाली होती. यामुळे येथील सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या राजकीय मंडळीसह सर्व सामान्यांनाही त्या भागाच्या आरक्षणाची प्रतीक्षा होती. यामुळे अखेर गुरुवारी आरक्षणाची सोडत करण्यात आली. या आरक्षणातून चारही नगरपंचायतीत कही गम तर कही खुशीचे वातावरण पसरले आहे. कारंजा तालुक्यात सर्वाधिक जागा महिलांना मिळाल्याने पुरूषांच्या स्वप्नावर पाणी फिरल्याचे चित्र निर्माण झाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
कारंजात महिला राजचे संकेत
कारंजा नगर पंचायतीचे एकूण १७ प्रभागाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. येथील चरडे सभागृहात उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे, तहसीलदार कारंजा एस.एस. काशिद यांची उपस्थिती होती. चिठ्ठ्या टाकून एका चिमुकल्याच्या हातून त्याची सोडत काढण्यात आली. यात सर्वाधिक उमेदवार महिलाच राहणार असल्याने ईच्छुकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. सर्वाधिक जागा महिलांनीच आरक्षित केल्याने येथे महिला राज येण्याची दाट शक्यता आहे. कारंजा नगरपंचायतीचे आरक्षण वार्ड क्र ९ मध्ये अनुसचित जातीपैकी स्त्री किंवा सर्वसाधारणसाठी राखीव होते. येथे अनुसचित जाती सर्वसाधारणचे आता आरक्षण आहे. एकूण १६ वार्डापैकी नामाप्रसाठी वॉर्ड क्र. ७ आणि ३ तर नामाप्र महिला वार्ड क्रमांक १३, २, आणि १७ असे राहील. सर्वसाधारण महिलेकरिता वार्ड क्र मांक १०,११,१२,१४,१५ व १६ अश्या नऊ जागेचे आरक्षण आहे. सर्वसाधारण जागेकरिता वार्ड क्रमांक १, ४, ५, ६, व ८ असे आहेत. या पाच वार्डांतच पुरुषांना नशिब आजमावता येईल. नगर पंचायतीच्या एकूण १७ वार्डात ९ महिला उमेदवारच राहणार तर उर्वरित ८ वार्डात जागेककरिता पुरुषांना संधी मिळेल. पहिल्यावहिल्या नगर पंचायतीच्या इतिहासात महिला राजचे चित्र आहे. याप्रसंगी तलाठी प्रदीप ताकसांडे व नगर पंचायतीचे कर्मचारी तसेच गावकरी व विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
समुद्रपूर येथेही सोडत
समुद्रपूर नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत करण्यात आली. यात वॉर्ड क्रमांक १, ४, १२ नामाप्र. महिला, वॉर्ड २, १४ अनुसुचित जाती पुरूष-महिला, वॉर्ड ३, ९ सर्वसाधारण महिला, वॉर्ड ५, ७, १० सर्वसाधारण पुरूष-महिला, वॉर्ड ६ सर्वसाधारण महिला, वॉर्ड ८ अनुसूचित जाती महिला, वॉर्ड ११, १३ नामाप्र, पुरूष किंवा महिला, वॉर्ड १५ अनुसूचित महिला, वॉर्ड १६ अनुसूचित जमाती महिला, वॉर्ड क्र.१७ अनुसूचित जमाती पुरूष किंवा महिला अशी आरक्षणाची सोडत निघाली. समुद्रपूर तहसील कार्यालय दुपारी १ वाजता उपविभागीय अधिकारी समुद्रपूर, निवडणूक अधिकारी नागरिक, बाबाराव भुटे, सुभाष, प्रफुल, गजानन राऊत, देवराव खोब्रागडे यांच्यासह अनेक ग्रामवासीयांच्या समक्ष ईश्वर चिठ्ठी ही सोडत काढण्यात आली.
सेलूत १७ सदस्य
सेलू ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्याने गुरुवारी विद्यादीप सभागृहात १७ प्रभागाचे आरक्षणाची काढण्यात आले. आरक्षणाची सोडत काढताना उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार सुरेंद्र होळी, नायब तहसीलदार अजय झिले यांची उपस्थिती होती. येथील नगरपंचायत १७ सदस्सीय राहणार आहे. आरक्षणात सर्वसाधारणा स्त्रीकरिता वॉर्ड क्रमांक १५, १७, ८, ३ तर नागरिकांचा मागास प्रवर्गात स्त्री राखीवसाठी वॉर्ड १६, १२, १३, सर्वसाधारण प्रवर्गासाठी वॉर्ड १०, ९, २, १, १४ तर वार्ड क्रमांक ५ अनुसुचित जाती स्त्रीकरिता आहे. वॉर्ड क्रमांक ७ अनु. जमाती पुरूष व वॉर्ड क्रमांक ११ अनु. जमाती स्त्रीकरिता राखीव झाला आहे. वॉर्ड ४ व ६ नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव झाला आहे. ही प्रभाग रचना २०११ च्या जनगणनेनुसार करण्यात आली आहे.
आष्टीतील सोडतीने राजकीय वातावरण तापले
आष्टी (शहीद)- येथील वॉर्डाचे आरक्षण सोडत आज तहसीलदार सीमा गजभिये यांच्या हस्ते झाले आहे. यामध्ये एकूण १७ वॉर्डाचे नगरसेवक निवडण्यासंदर्भात लागणारे वॉर्ड आरक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. सर्वच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींचा डोळा यावर असल्याने आरक्षण सोडत होताच येथे राजकीय वातावरण तापणे सुरू झाले आहे.
यामध्ये वॉर्ड १ सर्वसाधारण महिला, वॉर्ड २ सर्वसाधारण, वॉर्ड ३ सर्वसाधारण महिला, वॉर्ड ४ ओबीसी महिला, वॉर्ड ५ सर्वसाधारण महिला, वॉर्ड ६, वॉर्ड ७ सर्वसाधारण महिला, वॉर्ड ८ ओबीस पुरूष, वॉर्ड ९ सर्वसाधारण, वॉर्ड १० महिला ओबीसी, वॉर्ड ११ ओबीसी महिला, वॉर्ड १२ सर्वसाधारण महिला, वॉर्ड १३ सर्वसाधारण, वॉर्ड १४ ओबीसी पुरूष, वॉर्ड १५ सर्वसाधारण वॉर्ड १६ अनुसूचित जाती, वॉर्ड १७ अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव आहे.
वॉर्ड आरक्षण जाहीर होताच निवडणूकीचा चर्चेला उधाण आले आहे. यावेळी नायब तहसीलदार मृदुलता मोरे, नायब तहसीलदार सोनोवणे उपस्थित होते.