तामसवाडा महिला सरपंचासह १० जणांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

By Admin | Updated: April 26, 2015 01:28 IST2015-04-26T01:28:20+5:302015-04-26T01:28:20+5:30

सेलू तालुक्यातील तामसवाडा येथील पुतळाप्रकरणी शनिवारी दिवसभर तामसवाड्यात महिलांच्या व वर्धेत बसपाच्या आंदोलनानंतर

Astrality crime against 10 people, including Tamaswada woman Sarpanch | तामसवाडा महिला सरपंचासह १० जणांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

तामसवाडा महिला सरपंचासह १० जणांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा

वर्धा : सेलू तालुक्यातील तामसवाडा येथील पुतळाप्रकरणी शनिवारी दिवसभर तामसवाड्यात महिलांच्या व वर्धेत बसपाच्या आंदोलनानंतर सेलू पोलिसांनी सायंकाळी तेथील सरपंचासह १० जणांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केल्याने तणाव शांत झाला.
पुतळा हटविल्यावरुन सकाळपासून तामसवाडा येथे २५ महिलांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते, तर आंजी (मोठी) व येळाकेळी येथे संतप्त मंडळींनी टायरची जाळपोळ केल्यामुळे वर्धा-आर्वी मार्गाची वाहतुक प्रभावित झाली होती. दुपारी वर्धेत बसपाचे जिल्हाध्यक्ष उमेश म्हैसकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. दरम्यान, म्हैसकरसह मोहन राईकवार, सुनील डोंगरे, मनीष पुसाटे, कुंदन जांभुळकर, राजू लोहकरे, अमित देशभ्रतार यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना निवेदन सादर केले. यामध्ये पुतळा उचलून चबुतऱ्याची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करा व पोलिसांच्या ताब्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गाववासियांनी परत करावा, अशी मागणी लावून धरली होती.
निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांच्याशी झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने शिष्टमंडळाने तिथेच ठिय्या मांडला. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांच्या नेतृत्वात शहरचे ठाणेदार मुरलीधर बुराडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश चाटे यांनी शिष्टमंडळासह १११ बसपा कार्यकर्त्यांना अटक करुन पोलीस मुख्यालयात नेले. तेथेही कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केले. या नंतरच्या घडमोडीअंती पोलिसांनी संबंधितांवर अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची ंमागणी मान्य केली. यानंतर बसपा कार्यकर्त्यांची आंदोलन मागे घेताच सुटका करण्यात आली, तर लता वामनराव राऊत रा. तामसवाडा यांच्या तक्रारीवरुन सेलू पोलिसांनी तामसवाडाच्या सरपंच छाया अरुण कोहळेसह छगू रमेश अडसुळे, हेमंत सुरेश अडसुळे, उमेश रमेश अडसुळे, सुभद्रा भाऊराव सिडाम, बेबी धुर्वे, मिना विजय कोवे, समित्रा हरी कोकाटे, दुर्गा बबलू कोकाटे व समीक्षा उमेश अडसुळे यांच्याविरुद्ध कलम २९५ अधिक ३४ भादंवि व आर.डब्लू. ३(१),१० अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सेलू ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सुनील बाळसराफ यांनी केली.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Astrality crime against 10 people, including Tamaswada woman Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.