विधानसभा निवडणुकीची चाहुल

By Admin | Updated: July 19, 2014 01:38 IST2014-07-19T01:38:00+5:302014-07-19T01:38:00+5:30

विधानसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजु शकतो.

Assembly elections are expected | विधानसभा निवडणुकीची चाहुल

विधानसभा निवडणुकीची चाहुल

मतदार नोंदणीवर भर : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
वर्धा :
विधानसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजु शकतो. या अनुषंगाने निवडणूक आयोग्याच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करण्यात येणार आहे. यात मतदार नोंदणीसह मतदार याद्यांमधून नाव गहाळ झाले, गाव बदलले, नावातील चुका यासह अनेक बाबींची पूर्तता केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी दिली.
वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ आहे. या क्षेत्रात ही प्रक्रिया राबिवली जाणार आहे. नामांकन भरण्याच्या दहादिवसांआधीपर्यंत मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. कुणाची नावे चुकीने वगळली असेल तर ती नावेही समाविष्ट केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे या अनुषंगाने १५ हजार तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी १४ हजार ८८७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत नवमतदारांची अधिक नोंद करण्यासाठीही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तसेच महिलांसाठी अशाच प्रकारे शहर गावपातळीवर मोहीम राबविली जाणार आहे. यासोबतच तरुणवर्ग आणि महिला वर्गांचा मतदानाचा टक्का वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
सीईओ.महाराष्ट्र.जीओव्ही.आयएन या संकेतस्थळावरही मतदार नोंदणी व चुकांची दुरुस्ती करण्याची सोय आहे. मतदार यादीत नाव आहे, मात्र त्यांचे ओळखपत्र अद्याप तयार झालेले नाही, ती प्रक्रियासुद्धा पार पाडली जाणार आहे. चारही विधानसभा क्षेत्रात सद्य:स्थितीत १० लाख २० हजार १६२ मतदार आहेत. यामध्ये ५ लाख ३१ हजार ७६४ पुरुष तर चार लाख ८८ हजार ३९१ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात छायाचित्र ओळखपत्राची टक्केवारी ९२.३५ इतकी आहे. सर्वाधिक ९७.२२ टक्के हिंगणघाट विधानसभा क्षेत्र तर सर्वात कमी ८६.३६ टक्के वर्धा विधानसभा क्षेत्रातील आहे. एकंदर ९ लाख ३७ हजार १४७ मतदारांकडे छायाचित्र असलेले ओळखपत्र आहे, तर ८३ हजार १५ मतदारांकडे अद्यापही छायाचित्र असलेले ओळखपत्र नाही. ओळखपत्र असूनही मतदार यादीत नाव नसेल तर मतदान करता येणार नाही, तेव्हा प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करण्याचे आव्हानही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश मेश्राम उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Assembly elections are expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.