शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 23:42 IST

दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत असलेल्या सहाय्यक फौजदार उमेश हरणखेडे यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांच्या अंगावर एका दारूविक्रेत्याने त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहन थेट नेऊन प्राणघातक हल्ला केला.

ठळक मुद्देदारूविके्रत्याचा प्रताप : समुद्रपूर-शेडगाव मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा / समुद्रपूर : दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत असलेल्या सहाय्यक फौजदार उमेश हरणखेडे यांच्यासह काही पोलीस कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांच्या अंगावर एका दारूविक्रेत्याने त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहन थेट नेऊन प्राणघातक हल्ला केला. ही घटना समुद्रपूर-शेडगाव मार्गावर शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात सदर दारूविक्रेत्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोळा या सणादरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राहवी. शिवाय दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या हेतेने समुद्रपूर पोलीस ठाण्याच्यावतीने विशेष मोहीम राबवून ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी शुक्रवारी करण्यात आली. याच विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून समुद्रपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार उमेश हरणखेडे व त्यांचे काही सहकारी समुद्रपूर-शेडगाव मार्गावरील समुद्रपूर शिवारातील कॅनल जवळ नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. याचवेळी एम.एच. ४९ ए. एफ. ०७०३ क्रमांकाची कार येत असल्याने त्याच्या चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा पोलिसांनी दिला. परंतु, सदर वाहनचालकाने वाहन न थांबविता सहाय्यक फौजदार हरणखेडे यांना ठार करण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर वाहन नेत प्राणघातक हल्ला केला. आरोपी वाहनचालक इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या ताब्यातील वाहनाने एम. एच. ३२ जे. ०१८७ क्रमांकाच्या पोलिसी वाहनास तसेच एका पोलीस अधीकाऱ्याच्या एम.एच. ३२ ए.एच. ३१०४ या खासगी वाहनाला धडक देत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यात सदर दोन्ही वाहनांचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.पोलिसांनी एम.एच. ४९ ए. एफ. ०७०३ क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी कारचालकाविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात अप. क्र. ४८९/१८ कलम ३०७, ३३२, ३३३, ४२७, भादंवि सह कलम ६५(अ)(ई)७७(अ)मु.दा.का. कलम ११९/१७७, १८४ मोवाका कलम ३ सार्वजनिक मालमत्तेस हानी प्रतिबंधक अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर करीत आहेत.अधिकाऱ्यांसह तीन पोलीस कर्मचारी जखमीदारू भरलेल्या कारच्या चालकाने समुद्रपूर पोलिसांच्या शासकीय वाहनाला धडक देत पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर यांच्या खासगी वाहनाला धडक दिली. या घटनेत समुद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रविण मुंडे व दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रसंगी काळोखाचा फायदा घेत दारूची वाहतूक करणाºया कारच्या चालकाने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस