शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

‘पत्नीच्या शेजारी का बसला’ म्हणत कर्तव्यावरील पोलिसांना मारहाण भोवली; पतीस कारावासासह दंड

By महेश सायखेडे | Updated: December 9, 2022 16:43 IST

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पतीस न्यायालयाने ठोठावली शिक्षा

वर्धा : ‘पत्नीच्या शेजारी का बसला’ असे म्हणत वाद करून थेट दोन पोलिसांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अयफाज जमीर शेख असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.

वर्धा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ आर. व्ही. अदोने यांनी आरोपी अयफाज जमीर शेख याला भांदविच्या कलम ३५३ अन्वये सहा महिन्यांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच कलम २९४ अन्वये एक महिन्यांचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये सहा महिन्यांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

अशी घडली होती घटना

पोलिस शिपाई मनोज सुखदेव सूर्यवंशी व महिला पोलिस शिपाई पूजा अनिल गिरडकर हे पोलिस स्टेशन कारंजा येथे सन २०२० मध्ये कार्यरत होते. कोविड काळातील लॉकडाऊन काळात २३ मे २०२० रोजी महिला पोलिस शिपाई पूजा गिरडकर या सायंकाळी ड्यूटी असताना रात्री १०.३० ते ११.३० वाजताच्या सुमारास पोलिस स्टेशनचा विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला. लाईट गेल्याने व वायरलेसचा डी. सी. आणि सी. टी. एन. एस.चा गोषवारा पोलिस अधीक्षक कार्यालयास पाठवायचा असल्याने मनोज सूर्यवंशी हे पूजा हिला संबंधित गोषवारा वाचून दाखवित होते. 

दरम्यान महिला पोलिस शिपाई पूजा गिरडकर हिचा पती अयफाज जमीर शेख हा तेथे आला. त्याने मनोज सूर्यवंशी यांना तू माझ्या पत्नीच्या शेजारी बसून काय करीत आहे, असे म्हणून वाद घातला. आरोपी अयफाज जमीर शेख इतक्यावरच थांबला नाही तर त्याने शिवीगाळ करून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर याप्रकरणी कारंजा पोलिस ठाण्यात तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलिस निरीक्षक आर. टी. शेटे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायाप्रविष्ट केले.

आठ साक्षदारांची तपासली साक्ष

याप्रकरणी न्यायालयात एकूण आठ साक्षदारांची साक्ष तपासण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून सहा. पोलिस निरीक्षक अशोक सोनटक्के यांनी काम पाहिले. शासकीय बाजू ॲड. चारूशिला पौनिकर यांनी पाहिले. दाेन्ही बाजूचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwardha-acवर्धा