माय-लेकावर प्राणघातक हल्ला; तलवार अन् दुचाकी सोडून आरोपींनी केला पोबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 05:30 PM2022-09-23T17:30:05+5:302022-09-23T17:31:21+5:30

हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा

Assault on mother-son with a sword; The accused left the sword and the bike and ran away | माय-लेकावर प्राणघातक हल्ला; तलवार अन् दुचाकी सोडून आरोपींनी केला पोबारा

माय-लेकावर प्राणघातक हल्ला; तलवार अन् दुचाकी सोडून आरोपींनी केला पोबारा

Next

मांडगाव (वर्धा) : हातात तलवार घेऊन दुचाकीने आलेल्यांनी मायलेकांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना मांडगाव येथे गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. तलवार व दुचाकी घटनास्थळी सोडून आरोपींनी पोबारा केला. या घटनेत मुलास गंभीर दुखापत झाली असून, मुलाची आईही जखमी झाली.

सूरज माणिक भगत (२४) असे जखमी मुलाचे, तर रत्नमाला माणिक भगत (दोन्ही रा. मांडगाव) असे जखमी आईचे नाव आहे. सूरज भगत यास आरोपी सुकेश कालिदास मेंढे याने रात्री ९.३० च्या सुमारास भेटण्याच्या बहाण्याने घराजवळील सिमेंट रोडवर बोलावले. अशातच सूरज याच्यावर तलवारीने हल्ला चढविण्यात आला. यात सूरजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, भर रस्त्यावर हाणामारी होत असल्याचे लक्षात येताच लक्ष्मण भगत याने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. अशातच परिसरातील नागरिकही गोळा झाले.

नागरिकांचा जमाव लक्षात घेता आरोपींनीही तलवार आणि दुचाकी (क्र. एमएच ३२ एक्स ७३०५) घटनास्थळी सोडून पोबारा केला. या घटनेत सूरजची आई रत्नमालाही जखमी झाली. याप्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

Web Title: Assault on mother-son with a sword; The accused left the sword and the bike and ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.