आसिफच्या पोलीस कोठडीत वाढ
By Admin | Updated: November 24, 2014 23:01 IST2014-11-24T23:01:16+5:302014-11-24T23:01:16+5:30
येथील रूपेश मुळे नरबळी प्रकाणातील मुख्य आरोपी आसिफ शहा वल्द अजिम शहा उर्फ मुन्ना पठाण रा. वर्धा याची पोलीस कोठडी संपत असल्याने सोमवारी न्यायालयात हजर केले.

आसिफच्या पोलीस कोठडीत वाढ
पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
वर्धा : येथील रूपेश मुळे नरबळी प्रकाणातील मुख्य आरोपी आसिफ शहा वल्द अजिम शहा उर्फ मुन्ना पठाण रा. वर्धा याची पोलीस कोठडी संपत असल्याने सोमवारी न्यायालयात हजर केले. तपासाकरिता त्याची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केल्याने ती तीन दिवस म्हणजेच २७ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर गुप्तधन शोधन्याकरिता आसिफच्या संपर्कात आलेल्या सहाही जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
रूपेशच्या नरबळी प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून आसिफला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने रूपेशची हत्या करून त्याचे अवयव भाजून खाल्ल्याची कबुलीही पोलिसांना दिली होती. या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्याला तपासाकरिता २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याची कोठडी आज संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी तपासाकरिता त्याची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने २७ नोव्हेंबर पर्यंत त्याच्या कोठडीत वाढ केली आहे.
रूपेचा नरबळी देण्यापूर्ची गुप्तधन शोधण्याकरिता उत्तम महादेव पोहाणे (४३) रा. तळेगाव (टा.), अंकुश सुरेश गिरी (१८) रा. बोरगाव (मेघे), सुरेश रामराव धनोरी (४५) रा. वर्धा, दिलीप बाळकृष्ण भोगे (३७) रा. बोरगाव (मेघे) (मूळ सेलू तालुक्यातील हिंगणी येथील रहिवासी) व दिलीप उत्तम खाणकर (३४) रा. देवळी या पाच जणांनी आसिफशी संपर्क साधला होता. या प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यांनाही न्यायालयाने २४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस काठडी दिली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या पाच जणांनी देवळी येथे ज्या शेतात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न केला होता ती शेती मक्त्याने करणाऱ्या सुरेश भोयर याला अटक केली होती. त्यालाही न्यायालयील कोठडी देण्यात आली होती.(प्रतिनिधी)