आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:26 IST2018-07-04T23:26:44+5:302018-07-04T23:26:58+5:30
आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाकचेरीसमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींनी मनोगत व्यक्त करताना सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला.

आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी बुधवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाकचेरीसमोर धरणे दिले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या काहींनी मनोगत व्यक्त करताना सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान जनतेच्या निरोगी आरोग्यासाठी कायमस्वरूपी कार्यक्रम म्हणून राबवावा. ४५ व्या भारतीय कामगार परिषदेच्या शिफारशी आशा गटप्रवर्तकांना लागू करण्यात याव्या. आशा गटप्रवर्तकांना कामगार म्हणून मान्यता देण्यात यावी. त्यांना किमान वेतन १८ हजार रुपये देण्यात यावे. सेवानिवृत्तीनंतर आशा गटप्रवर्तकांना प्रत्येक महिन्याला किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी. त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आरोग्य सेवेचा लाभ देण्यात देण्यात यावा. विविध कारणे पुढे करून केल्या जात असलेल्या खाजगीकरणाला पायबंध घालण्यात यावा आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्त्व अल्का जरादे, मिनाक्षी गायकवाड, अर्चना घुगरे, भैया देशकर, आशा खोंडे, छाया बुरबुरे, अल्का पुरी, रमा ढोले, सुनीता धोंगडे, जयमाला झाडे, राजेंद्र साठे, दीपाली कार्लेकर यांनी केले. आंदोलनात आशा गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.