शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार जाहीर होताच भाजपमध्ये धुसफूस

By रवींद्र चांदेकर | Updated: March 18, 2024 19:38 IST

अंतर्गत असंतोष : हिरमुसलेल्या इच्छुकांकडून व्यक्त होतेय खदखद.

वर्धा : भारतीय जनता पक्षाने गुरुवार, १४ मार्चला लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा केली. लागोपाठ तिसऱ्यांदा रामदास तडस यांना उमेदवारी दिली. उमेदवारी घोषित होताच तडस यांच्या समर्थकांनी जल्लोष केला, तर पक्षांतर्गत विरोधकांमध्ये धुसफूस सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आपल्या उमेदवाराची घोषणा करून पहिल्या टप्प्यात विरोधी महाविकास आघाडीवर मात केली केली. भाजपाने सलग तिसऱ्यांदा विद्यमान खासदार रामदास तडस यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. त्यामुळे तडस यांच्यासमोर विजयाची हॅटट्रिक साधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. विरोधकांना आव्हान देण्यासाठी ते सज्ज झाले असताना पक्षांतर्गत धुसफुसीमुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याचे संकेत मिळत आहे. तडस यांना उमेदवारी घोषित होताच भाजप उमेदवारीच्या शर्यतीत असलेले त्यांचे पक्षांतर्गत विरोधक खदखद व्यक्त करीत आहे. 

गेल्या १० वर्षांपासून रामदास तडस खासदार असल्याने काही प्रमाणात पक्षातच त्यांच्याविषयी नाराजी वाढल्याचे सांगितले जाते. भाजपच्या एका माजी खासदाराने थेट माध्यमांसमोरच तडस यांच्याप्रती नाराजी व्यक्त केली. तडस दुसऱ्या पक्षातून आले, त्यांच्या कार्यकाळात इतर पक्षातील कार्यकर्त्यांना जास्त वाव मिळतो, असा थेट आरोपच त्यांनी केला. शर्यतीतील एका दुसऱ्या इच्छुकाने पक्षाच्या सामाजिक मेळाव्यात आमदार झाल्याच्या अविर्भावात तुमच्या समस्या मी विधानसभेत मांडून मार्ग काढतो, अशी उपस्थितांना चक्क ग्वाहीच देऊन टाकली. लोकसभेची उमेदवारी नाही मिळाली, तरी किमान विधानसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणर, या थाटात ते बोलून गेले. यातून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याची त्यांची खदखद जगजाहीर झाली. 

भाजपच्या दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली ही खदखद तडस यांच्यासमोर आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. शिवाय, भाजपच्या मातृ संघटनेतील अनेक पदाधिकारी अन् कार्यकर्तेही तडस यांच्यावर ‘नाराज’ असल्याचे सांगितले जाते. त्यांची नाराजी विरोधी उमेदवाराच्या पथ्यावर पडू शकते. मात्र, तसे काही होणार नसल्याचेही सांगितले जाते. तथापि, पक्षातील ही खदखद तूर्तास तडस यांची डोकेदुखी निश्चतच वाढवू शकते. विरोधकांची उदासीनता कायमचभाजप उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे करून त्यांची हॅटट्रीक रोखण्याची नामी संधी यावेळी विरोधकांना चालून आली. मात्र, विरोधकांचा उमेदवारीचा गुंताच अद्याप सुटलेला नाही. त्यांना अजून पक्ष आणि उमेदवारही ठरविता आला नाही. निवडणुकीची घोषणा झाली असताना विरोधी उमेदवार कोण, याचा थांगपत्ता नाही. प्रत्यक्ष मतदानासाठी केवळ महिनाभराचा अवधी उरलेला असताना विरोधकांमध्ये उदासीनता कायम आहे. त्यांची हीच उदासीनता भाजप उमेदवाराच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :BJPभाजपा