आर्वीच्या विजयला धामणगावच्या दोघांनी संपविले, गळा आवळून केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST2020-12-06T05:00:00+5:302020-12-06T05:00:15+5:30
मारडा शिवारातील कॅनलमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने सुरूवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. त्यानंतर सुरूवातीला पोलिसांनी मृतकाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले असता मृतक हा आर्वी येथील असल्याचे पुढे आले. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयीत आरोपी म्हणून धामणगाव येथून किसन सुदाम मंडधवरे (४८) आणि रमेश उदयभान भोयर (४०) दोन्ही रा. धामणगाव (रेल्वे) जि. अमरावती यांना ताब्यात घेवून विचारपूस केली.

आर्वीच्या विजयला धामणगावच्या दोघांनी संपविले, गळा आवळून केली हत्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : पुलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मारडा शिवारातील कॅनलमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश असले असून विजय बन्साेड रा. आर्वी असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची धामणगाव येथील दोघांनी गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
मारडा शिवारातील कॅनलमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने सुरूवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. त्यानंतर सुरूवातीला पोलिसांनी मृतकाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले असता मृतक हा आर्वी येथील असल्याचे पुढे आले. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयीत आरोपी म्हणून धामणगाव येथून किसन सुदाम मंडधवरे (४८) आणि रमेश उदयभान भोयर (४०) दोन्ही रा. धामणगाव (रेल्वे) जि. अमरावती यांना ताब्यात घेवून विचारपूस केली. सुरूवातीला उडवा उडवीचे उत्तरे देणाऱ्या आरोपींनी पोलिसी हिसका मिळताच गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय आपणच त्याला दुचाकीवर बसवून मंगरूळ दस्तगीर मार्गे धनोडी (ब.) येथील धरणाजवळ नेले. शिवाय तेथे त्याला बळजबरी दारू पाजून त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. शिवाय पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींच्या या कबुलीवरून पोलिसांनी या प्रकरणी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून किसन मंडधवरे व रमेश भोयर याला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचे घटनास्थळ आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने हे प्रकरण आर्वी पोलिसांकडे वळते करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात पुलगावचे ठाणेदार रवींद्र गायकवाड, खुशाल राठोड, चंद्रभान मेघरे, बाबुलाल पंधरे, महादेव सानप, रूपेश रघाटाटे, विनोद रघाटाटे, जयदीप जाधव, मुकेश वांदिले, अशोक रामटेके, मोसीम शेख यांनी केली.