आर्वीची कथित अन्नपूर्णा माता पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Updated: November 29, 2015 02:53 IST2015-11-29T02:53:55+5:302015-11-29T02:53:55+5:30

अंगात देवी येते, असे म्हणत एका मुलीच्या तोंडात लिंबू कोंबून तिला चाबकाने मारहाण करणाऱ्या आर्वी तालुक्यातील वडगाव (पांडे) येथील कथीत अन्नपूर्णादेवी..

Arvi's alleged Annapoorna mother is under police custody | आर्वीची कथित अन्नपूर्णा माता पोलिसांच्या ताब्यात

आर्वीची कथित अन्नपूर्णा माता पोलिसांच्या ताब्यात

मुलीवर अत्याचार : महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा
वर्धा : अंगात देवी येते, असे म्हणत एका मुलीच्या तोंडात लिंबू कोंबून तिला चाबकाने मारहाण करणाऱ्या आर्वी तालुक्यातील वडगाव (पांडे) येथील कथीत अन्नपूर्णादेवी ऊर्फ रुख्मा अशोक मेश्राम हिला सेवाग्राम पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. या महिलेने उपचाराच्या नावावर रोठा येथील एका चिमुकलीवर अनेक अत्याचार केल्याची तक्रार याच भागातील एका महिलेने सेवाग्राम पोलीस ठाण्यात केली होती.
पोलिसात आलेल्या तक्रारीवरून पहिलेच पोलिसांनी कथीत अन्नपूर्णा देवीच्या आश्रमातून मुलीवर अत्याचार करण्याकरिता वापरलेला चाबूक व इतर साहित्य जप्त केले होते. पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच ही कथीत अन्नपूर्णा देवी पसार झाली होती. सेवाग्राम पोलिसांनी केलेल्या कारवाईत ती यात दोषी असल्याचे समोर आल्याने तिच्या अटकेची कारवाई करण्याचा निर्णय झाला. यावरून पोलिसांनी कारवाई करीत तिला शनिवारी वडगाव येथून ताब्यात घेतले. शिवाय तिच्याकडे जात गावातील महिलेवर जादूटोण्याचा आळ आणणाऱ्या दाम्पत्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सेवाग्रामचे ठाणेदार पराग पोटे यांनी दिली.

उपचाराच्या नावावर मुलीवर केले अत्याचार
भूतबाधा झाल्याची बतावणी
वर्धा : रोठा येथील एका दाम्पत्याच्या मुलीची प्रकृती ठीक राहत नव्हती. त्याने अनेक रुग्णालयात औषधोपचार केले, मात्र तिच्यावर त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान गावातील गावातील एका इसमाने त्याला या मुलीला भूतबाधा झाल्याची बातावणी करून तिला आर्वी तालुक्यातील अन्नपूर्णा देवीकडे नेण्याचा सल्ला दिला.
यानुसार अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या दाम्पत्याने आपल्या मुलीला घेवून या अन्नपूर्णा देवीच्या दरबारात गेला. येथे अन्नपूर्णा देवी उर्फ रुख्मा मेश्राम हिने या मुलीवर उपचाराच्या नावावर अनेक अत्याचार केले. तिच्या तोंडात लिंबू कोंबून तिला चाबकाने मारहाण केली. यात तिच्यावर गावातील गावातील एका महिलेने जादू केल्याचे सांगितले.
सदर महिला ही मूळ रोठा येथील असून सध्या नागपूर येथे वास्तव्यास आहेत. ती दिवाळीनंतर गावात परत आली असता तिने जादूटोणा केल्याचे त्यांच्या कानावर आले. यावरून त्यांनी त्या दाम्पत्याशी संपर्क साधत त्याला या प्रकरणाची विचारणा केली असता त्यानेही तिच्यावर आळ घेतला. यावरून सदर महिलेने सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करीत या कथित अन्नपूर्णा मातेच्या दरबारावर छापा घातला. दरम्यान ही देवी पसार झाली. यावरुन पोलिसांनी तिच्या दरबारातून चाबुक व इतर साहित्य जप्त केले.
या कथित अन्नपूर्णा मातेचा शोध सुरू असताना ती घरी आल्याची माहिती मिळताच तिला ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्यावर कलम ३, नरबळी व इतर अमानुष अनिष्ठ प्रथा, जादूटोणा, प्रतिबंधक समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अन्वये गुनहा दाखल केला आहे. या प्रकरणात रुख्मा मेश्राम सह महिलेवर जादूटोण्याचा आळ घेणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Arvi's alleged Annapoorna mother is under police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.