शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खत अन् बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आर्वी अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

बुधवारपर्यंत जिल्ह्यातील ४१० शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांच्या बियाण्यांचे तब्बल ३ हजार १०१ पॅकेटची मागणी नोंदविली आहे. वर्धा तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांनी २७३, सेलू तालुक्यातील २५ शेतकऱ्यांनी १४८, देवळी तालुक्यातील अकरा शेतकऱ्यांनी ४९, आर्वी तालुक्यातील ९६ शेतकऱ्यांनी ४८६, आष्टी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी ४९, कारंजा तालुक्यातील ७१ शेतकऱ्यांनी ४८३, हिंगणघाट तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांनी १ हजार १७ तर समुद्रपूर तालुक्यातील ६७ शेतकऱ्यांनी ५९६ पॅकेट बियाण्यांची मागणी नोंदविली आहे.

ठळक मुद्देनाविन्यपूर्ण उपक्रमाला स्वयंस्फूर्त प्रतिसाद : जिल्ह्यातील ४१० शेतकऱ्यांनी ३,१०१ पॅकेट बियाण्यांची नोंदविली मागणी

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी केंद्रांवरील शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या नेतृत्वात बांधावर आणि घरपोच बियाणे व खत पोहोचविण्याचा उपक्रम राबविला जात आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यातील ४१० शेतकऱ्यांनी खत आणि बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. बांधावर आणि घरपोच बियाणे व खत मिळण्यासाठी मागणी नोंदविण्यात सध्या आर्वी तालुका अव्वल असल्याचे बघावयास मिळत आहे.बुधवारपर्यंत जिल्ह्यातील ४१० शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांच्या बियाण्यांचे तब्बल ३ हजार १०१ पॅकेटची मागणी नोंदविली आहे. वर्धा तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांनी २७३, सेलू तालुक्यातील २५ शेतकऱ्यांनी १४८, देवळी तालुक्यातील अकरा शेतकऱ्यांनी ४९, आर्वी तालुक्यातील ९६ शेतकऱ्यांनी ४८६, आष्टी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी ४९, कारंजा तालुक्यातील ७१ शेतकऱ्यांनी ४८३, हिंगणघाट तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांनी १ हजार १७ तर समुद्रपूर तालुक्यातील ६७ शेतकऱ्यांनी ५९६ पॅकेट बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. तशी नोंद कृषी विभागाने घेतली आहे. ऑनलाईन पद्धतीने कृषी विभागाने तयार केलेल्या गुगलपेज व ॲपवर मागणी नोंदविलेल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खत आणि बियाणे वेळीच पोहोचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषी केंद्रचालकांच्या सहाय्याने विशेष प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या कोरोना संकटात जिल्हा प्रशासनाचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. शिवाय सध्या जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कोविड संकटातही कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी नव्या जोमाने माेहिमेच्या यशस्वीतेकरिता प्रयत्न क

१७,४३४ क्विंटल बियाण्यांचा झाला पुरवठाn खरीप हंगामात कपाशीचे ४ हजार ५४५ क्विंटल, तुरीचे ५ हजार २९५ क्विंटल, सोयाबीनचे ९२ हजार ६२५ क्विंटल, मकाचे १३८ क्विंटल, ज्वारीचे १६२ क्विंटल, मुगाचे ५८ क्विंटल, उडिदाचे ८५ क्विंटल, तिळाचे १ क्विंटल तर भूईमुगाचे ६७५ क्विंटल बियाण्याची गरज लागणार आहे.  त्यापैकी १७ हजार ४३४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा वर्धा जिल्ह्याला झाला आहे. तर उर्वरित बियाण्यांचा पुरवठा होत आहे.  

प्रत्येक शेतकऱ्याला बांधावर खत आणि बियाणे पोहोचवून देण्यासाठी कृषी विभाग जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांच्या सहकार्याने प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांनी खत आणि बियाण्यांची मागणी नोंदवावी, तसेच कुठली अडचण असल्यास थेट माझ्याकडे किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.- डॉ. विद्या मानकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक,     कृषी अधिकारी, वर्धा. 

३५ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले खत अन् बियाणेऑनलाइन पद्धतीचा वापर करून मागणी नोंदविल्यावर त्या शेतकऱ्यांच्या घरी किंवा बांधावर खत आणि बियाणे वेळीच कसे पोहोचेल यासाठी सध्या प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न होत आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत तब्बल ३५ शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाणे पोहोचते करण्यात आले. बुधवारीही काही शेतकऱ्यांना खत व बियाणे पोहोचविण्यात आले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती