लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : येथील नेहरु मार्केटच्या दारावर असलेल्या भाजी व फळ विक्रेत्यांना नगरपालिकेने दिलेल्या जागेवर व्यवसाय करावा, असे सांगत नगरपालिकेच्या पथकाने हटविण्याचा प्रयत्न केला. आज गुरुवारी बाजाराचा दिवस असल्याने फेरीवाल्यांनी आजही त्याच ठिकाणी विक्री सुरु केल्याने पालिकेच्यावतीने मज्जाव करीत हातगाडी जप्त केली. त्यामुळे नेहरु मार्केट परिसरात गोंधळ उडाला होता.आर्वी नगरपालिकेने विशेष निधी खर्च करून येथील इंदिरा चौकात फळ विक्रेते व भाजीविके्रत्यांसाठी व्यवसायाची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु हातगाडीवर भाजी व फळाचा व्यवसाय करणारे तेथे जाण्यास तयार नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासणाचीही अडचण होत आहे. नगरपालिकेने शिवाजी चौक ते गांधी चौक मार्गावरील फेरीवाल्यांना नोटीस बजावून कार्यवाही सुरू केल्याने हा मार्ग अनेक वर्षांनतर मोकळा झाला आहे. या मार्गाने दुचाकी तर सोडा, पायदळ जाणेही कठीण झाले होते. तसेच येथील दोन्ही नेहरुमार्केटची दुकाने ही पूर्णपणे अतिक्रमण करून समोर आल्याने वाहतुकीला अडथडा ठरत आहे. आमचे जसे अतिक्रमण काढले तसेच सर्व मार्केटमधील अतिक्रमण काढा अशी मागणी फेरीवाल्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना केली आहे.तसेच सुधीर जाचक यांच्या नेतृत्वात फेरीवाल्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन अडचणी मांडल्या व त्यावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.आर्वीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. ते काढण्याकरिता तहसीलदार आणि प्रशासनाच्या ही सूचना आहे. हातगाडी व फुटपाथवर व्यवसाय करणाºया भाजी व फळ विक्रेत्यांना येथील इंदिरा चौकात पक्के ओटे बांधून जागा उपलब्ध करून दिली आहे. दहा बाय दहाची जागा फळ विक्रेत्यांना तर दहा बाय बाराची जागा भाजी विक्रेत्यांना दिली आहे. त्यांनी तेथे जाऊन व्यवसाय केल्यास अतिक्रमणाची समस्या काही प्रमाणात सुटेल.साकेत राऊत, अभियंता, नगरपालिका आर्वी
आर्वी नगरपालिकेचा फेरीवाल्यांना मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST
आर्वी नगरपालिकेने विशेष निधी खर्च करून येथील इंदिरा चौकात फळ विक्रेते व भाजीविके्रत्यांसाठी व्यवसायाची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु हातगाडीवर भाजी व फळाचा व्यवसाय करणारे तेथे जाण्यास तयार नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासणाचीही अडचण होत आहे. नगरपालिकेने शिवाजी चौक ते गांधी चौक मार्गावरील फेरीवाल्यांना नोटीस बजावून कार्यवाही सुरू केल्याने हा मार्ग अनेक वर्षांनतर मोकळा झाला आहे.
आर्वी नगरपालिकेचा फेरीवाल्यांना मज्जाव
ठळक मुद्देबाजारात उडाला गोंधळ : पथकाने हातगाडी केली जप्त