शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
4
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
5
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
6
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
7
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
8
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
9
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
10
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
11
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
12
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
13
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
14
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
15
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
16
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
17
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
18
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
19
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आर्वी आमदाराची विधान भवनावर पदयात्रा सुरू

By admin | Updated: December 6, 2014 00:24 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमर काळे यांनी ...

तळेगाव (श्या़पंत़) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमर काळे यांनी शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी आर्वी ते नागपूर विधानभवनावर पायदळ मोर्चा काढला. सोमवार ८ डिसेंबर रोजी ही पदयात्रा विधानभवनावर धडकणार आहे़
पिकांची आणेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी असावी़, सोयाबीनचा योग्य मोबदला मिळावा़, वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या शेती नुकसानीसाठी बाबत उपाययोजना, प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या, बेरोजगारी, आदी मागण्यांवर तोडगा काढण्याकरिता ही पदयात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता आर्वीवरून निघाली. दुपारी ३ वाजता ही पदयात्रा तळेगाव(श्या.प.) येथे पोहोचल्यावर पदयात्रेचे आणि आमदार अमर काळे यांचे स्वागत करण्यात आले़ निसर्गाच्या अवकृपेने आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही तालुक्यांत दृष्काळाने थैमान घातले. सोयाबीन पीक हातचे गेले तर कपाशी पिकावर लाल्या रोगाचे अतिक्रमण होऊन खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले़ त्यातही कमी भावात सोयाबीन खरेदी, कापसाला योग्य भाव नाही, अशी स्थिती आहे़ राज्य सरकारने अद्याप कापूस खरेदी केंद्र सुरू केली नाही़ खासगी व सीसीआयची खरेदी ४०५० पर्यंत सुरू आहे; पण हा भाव शेतकऱ्यांना खर्च बघता परवडणारा नाही़ ही दाहकता प्रशासनाला कळावी यासाठी पदयात्रा काढण्यात आली. आष्टी तालुक्यातील शेतकरी, तरूण यात सहभागी आहेत. सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बाहुबली मंदिरामध्ये सर्वांच्या जेवणाची होती. त्यानंतर पदयात्रा सारवाडी, कारंजा कडे रवाना झाली़(वार्ताहर)