पिपरीत भरउन्हात कृत्रिम पाणी टंचाई

By Admin | Updated: April 19, 2016 05:49 IST2016-04-19T05:49:39+5:302016-04-19T05:49:39+5:30

पिपरी (मेघे) येथील जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून परिसरातील ११ गावांना पाणीपुरवठा केल्या

Artificial water scarcity in piping | पिपरीत भरउन्हात कृत्रिम पाणी टंचाई

पिपरीत भरउन्हात कृत्रिम पाणी टंचाई

वर्धा : पिपरी (मेघे) येथील जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून परिसरातील ११ गावांना पाणीपुरवठा केल्या जातो. पिपरी येथील जलकुंभाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी लिक झाली आहे. या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने या परिसरातील पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा ठप्प झाल्याने येथील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आजपर्यंत जमा असलेले पाणी नागरिकांना पुरविण्यात आल्याची माहिती आहे.
शहरालगतच्या ११ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. योजनेत येळाकेळी येथील धाम नदीतून पाणीसाठा घेतला जातो. या योनजेचे जलकुं भ पिपरी (मेघे) येथील टेकडीवर आहे. येळाकेळी येथून या जलकुंभाला पाणीपुरवठा करण्यासाठी ५५० एमएमची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली; मात्र ही जलवाहिनी सतत लिक होत असल्याने लिकेज दुरूस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बंद केल्या जातो. यापूर्वी जलवाहिनीचे काम करण्यासाठी पाणीपुरवठा बंद केल्याचे प्रकार घडले आहे. मात्र आता उन्हाळा असल्याने पाणीटंचाईची झळ बसत आहे. शिवाय पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची कोणतीच सूचना नागरिकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकांनी अतिरिक्त साठाही करून ठेवलेला नाही. परिणामी वापरण्यासाठी देखील पाणी शिल्लक नाही. यापैकी काहींकडे बोअरवेल असल्याने त्यांना पाण्याकरिता भटकावे लागत नसले तरी नळाच्या आधारावर नळाचेच पाणी आहे त्या नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ फिरावे लागत आहे. पिपरी (मेघे) परिसरातील काही नागरी वस्तींवर भर उन्हात नागरिक पाण्याकरिता वणवण करीत असल्याचे दिसून आले.(स्थानिक प्रतिनिधी)

ओम कॉलनीत चार दिवसांपासून नळ कोरडे
४आलोडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ओम कॉलनी व परिसरातील गत चार दिवसांपासून नळ आलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी इरतत्र भटकावे लागत आहे. घरी साठवणूक करून असलेले पाणी संपल्याने पिण्याचे पाणीही आता घरात शिल्लक नाही.

पाणी पुरवठा बंदबाबत कुुठलीही सूचना नाही
४पाईपलाईन दुरूस्तीच्या कामाकरिता पिपरी (मेघे) सह परिसरातील १० गावांचा पाणीपुरवठा बंद केल्या जातो; मात्र जीवन प्राधिकरणकडून नागरिकांना याबाबत कोणतीच सूचना दिली जात नाही. या योजनेची देखरेख व व्यवस्थापनाची जबाबदारी जीवन प्राधिकरणाकडे आहे; मात्र यंत्रणेकडून सूचना देण्याविषयी आजवर कोणतीच काळजी घेण्यात आली नाही. परिणामी दोन-तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यास येथील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते.

जलवाहिनी होते सतत लिक
४मुख्य जलवाहिनीची जाडी ५५० एमएम आहे. या पाण्याचा दाब यापेक्षा अधिक असल्याने ही जलवाहिनी वारंवार लिक होत असल्याचे कळते. शिवाय जलवाहिनीचे काम करताना लावलेले जॉईन्ट वारंवार तुटत असल्याने येथूनही पाणी प्रवाहित होतो आणि पाण्याचा अपव्यय होतो. योजनेच्या प्रारंभी नळधारकांची संख्या अल्प होती. मात्र दिवसेंदिवस नळधारकांची संख्या वाढत असल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे अधिक पाणीसाठा करावा लागतो. प्रत्यक्षात या मुख्य जलवाहिनीची क्षमता कमी असल्याने यात तांत्रिक बिघाड येत असल्याचे संबंधितांनी सांगितले.

सदोष जलवाहिन्यांमुळे पुलगावच्या काही भागात पाणी टंचाई
४ पुलगाव - उन्हाचा पारा ४५ अंशावर पोहचला आहे. तापमानामुळे तालुक्यातील नदी, नाले कोरडे पडलेले आहेत. अप्पर व लोअर वर्धा धरणातील पाण्याचा साठाही कमी झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होणे स्वाभाविकच आहे. येथे मात्र चार दशकापुर्वी टाकण्यात आालेल्या सदोष जलवाहिनीमुळे शहरात काही भागात पाणी टंचाईची झळ पोहचत आहे. या प्रश्नावर कायम स्वरूपी उपाय म्हणून वर्धा नदीवर बांधण्यात येत असलेले पुलगाव बॅरेज रखडल्याने ही समस्या काम राहणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Artificial water scarcity in piping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.