शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा शहरावर कृत्रिम जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

वर्धा नगरपालिका प्रशासन येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून दररोज २७ द.ल.ली. पाण्याची उचल करते. उचल करण्यात आलेल्या पाण्यावर पवनार तसेच वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यावर त्या पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील १६ हजार कुटुंबांना करते. समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान येळाकेळी येथून पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून पाण्याची उचल करून वर्धा शहरातील १९ प्रभागातील नागरिकांना वर्धा नगरपालिका प्रशासन पाणी पुरवठा करते. परंतु, रस्त्याच्या कामादरम्यान येळाकेळी-वर्धा आणि पवनार-वर्धा या दोन्ही मुख्य जलवाहिनी फुटल्या. या दोन्ही जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ४८ तासांचा कालावधी लागणार असून पुढील दोन दिवस वर्धेकरांना पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा नागरिकांनी काटकसरीनेच वापर करावा, असे आवाहन न.प.च्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.वर्धा नगरपालिका प्रशासन येळाकेळी तसेच पवनार येथील धाम नदीच्या पात्रातून दररोज २७ द.ल.ली. पाण्याची उचल करते. उचल करण्यात आलेल्या पाण्यावर पवनार तसेच वर्धा शहरातील आयटीआय टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यावर त्या पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा वर्धा शहरातील १६ हजार कुटुंबांना करते. समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान येळाकेळी येथून पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. तर वर्धा-दत्तपूर या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान पवनार येथून वर्धा शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे पुढील दोन दिवस वर्धा शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा होणार नाही. या दोन्ही जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले जात असले तरी ते काम पूर्णत्त्वास जाण्यासाठी किमान ४८ तासांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

या परिसरातील नळाला येणार नाही पाणी

- मुख्य जलवाहिनी फुटल्याने वर्धा शहरातील साने गुरुजीनगर, गांधीनगर, सुदामपुरी, यशवंत कॉलनी, खडसे कॉलनी, मानस मंदिर, केळकरवाडी, आर्वी नाका परिसर, गजानननगर, म्हाडा कॉलनी, शास्त्री चौक, गौरक्षण वार्ड, भामटीपुरा, विग्नहर्तानगर, रामनगर, हिंदनगर, गोटेवादी, बापाटवाडी, पोतदार बगीचा, जैन मंदिर, कृष्णनगर, गुजराती भवन परिसर, मालगुजारीपुरा, इंदिरा मार्केट, वंजारी चौक, धंतोली चौक, राधानगर, साबळे प्लॉट, बचलर रोड, गोंड प्लॉट, हनुमाननगर, शिवनगर, स्टेशन फैल, दयालनगर, मांगगारुडी मोहल्ला, तारफैल, झाकीर हुसैन कॉलनी, एम.जी. मोहल्ला, सिव्हील लाईन, मोहिनीनगर, शिवाजी चौक परिसर, ठाकरे मार्केट, गोलबाजार, कच्छी लाईन, मुख्य बाजार पेठ, महादेवपुरा, लक्ष्मीनगर, स्नेहलनगर, सेवाग्राम रोड, बेद ले-आऊट, हिमालाय विश्व वसाहत, नागपूर रोड, महिला आश्रम, फुलफैल, आनंदनगर, इतवारा, लहानुजीनगर या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई