भाचीशी चाळे करणाऱ्या मामाला अटक
By Admin | Updated: October 1, 2015 02:49 IST2015-10-01T02:49:04+5:302015-10-01T02:49:04+5:30
भाचीशी अश्लील चाळे करणाऱ्या मामाला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी ताब्यात घेतले.

भाचीशी चाळे करणाऱ्या मामाला अटक
वर्धा : भाचीशी अश्लील चाळे करणाऱ्या मामाला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी ताब्यात घेतले. त्याला सेवाग्राम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस सुत्रानुसार, सावंगी (मेघे) परिसरातील एका महिलेला तीन मुली आहे. गरिबीमुळे ती कामाला जाते. घराजवळील प्राथमिक शाळेत तिच्या तीनही मुली शिकतात. शाळा सुटण्याच्या वेळी त्यांचा मामा किशोर वाघमारे हा दररोज शाळेबाहेर उभा राहत होता. पैकी नऊ वर्षीय भाचीला आमिष दाखवून घरी घेऊन जात होता. तिथे तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. यामुळे ती चिमुरडी जखमीही झाली होती. तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. बुधवारी मुख्याध्यापकांनी विचारणा केल्यावर हा प्रकार उघड झाला. शेजारच्या महिलेलाही शंका आल्याने तिने विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांना माहिती दिली. त्यांनी एपीएआय धर्मराज बोदिले, मनोज धात्रक, समीर कुरेशी, दिनेश तुमाने, राहुल गोसावी यांच्यासह बुधवारी दुपारी १ वाजता सावंगी गाठत मामा किशोर वाघमारेला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यास सेवाग्राम पोलिसांच्या स्वाधीन केले. सेवाग्राम पोलिसांनी कलम ३७६ (आय)(एफ), ५०६ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून रक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.(कार्यालय प्रतिनिधी)