कॉन्व्हेंटला टाळे ठोकणाऱ्या चपराशाच्या पतीला अटक
By Admin | Updated: October 25, 2014 22:45 IST2014-10-25T22:45:29+5:302014-10-25T22:45:29+5:30
खरांगणा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासोद येथील स्वप्नाली कान्व्हेंटला येथील एका इसमाने टाळे ठोकत फर्निचर व शालेय रेकॉर्ड लंपास केला होता. शाळा अध्यक्षाच्या तक्रारीवरून खरांगणा पोलिसांनी

कॉन्व्हेंटला टाळे ठोकणाऱ्या चपराशाच्या पतीला अटक
आकोली : खरांगणा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासोद येथील स्वप्नाली कान्व्हेंटला येथील एका इसमाने टाळे ठोकत फर्निचर व शालेय रेकॉर्ड लंपास केला होता. शाळा अध्यक्षाच्या तक्रारीवरून खरांगणा पोलिसांनी आरोपीवर कारवाई करून त्याला अटक केली आहे.
मासोद येथे स्वप्नील कॉन्व्हेंट नामक शाळा आहे. येथे नर्सरी ते के जी वन पर्यंत वर्ग असून ५० बालके शिक्षण घेतात. ब्राह्मणवाडा, सावगड व अन्य गावातील जंगलव्याप्त भागातील मुले येथे शिक्षण घेतात. चपराशी महिलेचा पती छत्रपती कुबडे रा. मासोद याने जंगल कामगार सहकारी संस्थेच्या इमारतीत भरणाऱ्या शाळेला कुलूप ठोकले होते. शाळा अध्यक्ष गुणवंत सपकाळ यांनी खरांगणा पोलिसात त्याबाबत तक्रार केली होती. खरांगणा ठाणेदार प्रशांत पांडे यांनी आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून फर्निचर व शालेय रेकॉर्ड शाळा व्यवस्थापनाच्या स्वाधीन केले. बुधवारपासून वर्ग नियमित सुरू करण्याचे शाळा व्यवस्थापनाने लेखी लिहून दिले. शाळेला अचानक कुलूप ठोकल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेतील चपराशी महिलेच्या पतीने शाळेला कुलूप ठोकून त्याने काही साहित्य लंपास केल्याने त्याचा या मागचा उद्देश काय असा प्रश्न समोर येत आहे. (वार्ताहर)