सपनाच्या मारेकऱ्यांना अटक करा!
By Admin | Updated: January 10, 2017 00:42 IST2017-01-10T00:42:31+5:302017-01-10T00:42:31+5:30
हिंगणघाट येथील सपना प्रवीण राडे हिचा जळून मृत्यू झाला. मात्र तिची आत्महत्या नसून हत्या आहे. या

सपनाच्या मारेकऱ्यांना अटक करा!
जिल्हा पोलीस अधीक्षकांना आई-वडिलांचे साकडे
देवळी : हिंगणघाट येथील सपना प्रवीण राडे हिचा जळून मृत्यू झाला. मात्र तिची आत्महत्या नसून हत्या आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या सासरच्या मंडळीवर हत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परंतु आरोपींना अटक करण्यात पोलिसांकडून हयगय होत असल्याचा आरोप मृतक सपनाच्या आई वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. या आरोपींवर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. सोमवारी त्यांनी दिलेले निवेदन पोलीस उपअधीक्षक (गृह) आर. जी किल्लेकर यांनी स्वीकारले.