मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक करा

By Admin | Updated: May 5, 2015 23:56 IST2015-05-05T23:56:59+5:302015-05-05T23:56:59+5:30

काकडधरा परिसरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले़ यातील आरोपीला त्वरित अटक करावी, ....

Arrest the girl who is abducting the girl | मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक करा

मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक करा

मागणी : शिवसेनेचे मोर्चाद्वारे ठाणेदाराला निवेदन
तळेगाव (श्या.पं.) : काकडधरा परिसरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले़ यातील आरोपीला त्वरित अटक करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली़ यासाठी पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठाणेदार दिनेश झामरे यांना निवेदन सादर केले.
आठ दिवसांपूर्वी महमूद पठाण (३५) याने काकडधरा येथील एका गरीब कुटुंबातील १५ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेले. संबंधित आरोपी हा विवाहित असून त्याला चार अपत्य आहेत. मुलगी पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने येथील पोलीस ठाण्यात केली होती; पण अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही़ यामुळे तिच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे़ यातील आरोपीला त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला़ आरोपीचा त्वरित शोध घ्या, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली़
आठ दिवसांत आरोपी अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेना उपजिल्हा प्रमुख नीलेश देशमुख, नीलेश कांबळे व पदाधिकाऱ्यांनी दिला़(वार्ताहर)

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे गुन्हेगार मोकाटच
तळेगाव येथे पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली; पण कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नाही़ यामुळे केवळ २७ कर्मचाऱ्यांवर परिसरातील गावांसह अपघात व तळेगाव येथील गुन्हेगारी रोखण्याचा भार आहे़ अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे गुन्हेगारांना जेरबंद करताना त्रास सहन करावा लागतो़ यामुळे गुन्हेगार मोकाटच राहत असल्याचे चित्र आहे़

Web Title: Arrest the girl who is abducting the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.