आष्टीतील चोरीत नागपुरातील आरोपीला अटक

By Admin | Updated: February 5, 2016 01:45 IST2016-02-05T01:45:16+5:302016-02-05T01:45:16+5:30

बंद घरात रात्रीला हात साफ करणाऱ्या नागपूर येथील चोरट्याला आष्टी पोलिसांनी नागपूर येथून अटक केली.

The arrest of the accused in the Ashti stolen from Nagpur | आष्टीतील चोरीत नागपुरातील आरोपीला अटक

आष्टीतील चोरीत नागपुरातील आरोपीला अटक

चोरट्याला न्यायालयीन कोठडी : ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त
आष्टी (शहीद) : बंद घरात रात्रीला हात साफ करणाऱ्या नागपूर येथील चोरट्याला आष्टी पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. त्याच्याकडून चोरीतील ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पंकज विघ्ने (२५) रा. नागपूर असे चोरट्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चोरीत दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची नोंद पोलिसात आहे.
पोलीस सुत्रानुसार, बाबाराव उरकुडे व अश्वीन धनगर रा. गणेशपूर वॉर्ड हे परिवारासह गावी गेले होते. त्यांची दोन्ही घरे चोरट्यांनी फोडून ऐवज लांबविला. ही घटना १ फेबु्रवारी रोजी घडली. या घटनेबाबत शेजारी असलेले अनुप भाऊराव दहाट (३०) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरट्याचा शोध घेतला असता तो नागपूर येथील असल्याचे समोर आले. माहितीवरून पंकज मंचित विघ्ने रा. तुकडोजी पुतळा मानेवाडा, नागपूर याला अटक करण्यात आली. त्याने चोरीची कबुली दिली असून घरातील ७० हजार रुपये किंमतीचे दागिने, ४५ हजार रुपये रोख असा एकूण १ लक्ष १५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचे सांगितले.
त्याच्याकडून पोलिसांनी ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्याची रवानगी न्यायालयाीन कोठडी करण्यात आली. आरोपी पंकज विघ्ने हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही अनेक चोरीच्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई ठाणेदार दिलीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक विष्णू कराळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.(प्रतिनिधी)

सोनसाखळी चोर पुन्हा सक्रीय
वर्धा - गत काही दिवसांपासून बेपत्ता असलेले सोनसाखळी चोर वर्धा शहरात पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसते. शहरात सुरक्षेकरिता ठाण्यांची संख्या वाढली असता या चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची सोनसाखळी पळवून पोलिसांना थेट आव्हाण दिल्याचे दिसून आले आहे. बुधवारी सायंकाळी स्वागत कॉलनी परिसरात रामनगर ठाण्याच्या एका सहायक पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची सोनसाखळी चोरट्यांनी पळविल्याची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

Web Title: The arrest of the accused in the Ashti stolen from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.