शहरात ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:43 IST2018-02-28T23:43:47+5:302018-02-28T23:43:47+5:30
नगर परिषद क्षेत्रात वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी नगर परिषद क्षेत्रातील सर्व मोकळ्या जागाचे सर्वेक्षण करून नाममात्र शुल्कासहीत वाहनतळाची व्यवस्था करावी,.....

शहरात ठिकठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करा
ऑनलाईन लोकमत
वर्धा : नगर परिषद क्षेत्रात वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी नगर परिषद क्षेत्रातील सर्व मोकळ्या जागाचे सर्वेक्षण करून नाममात्र शुल्कासहीत वाहनतळाची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हा सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार रामदास तडस यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., नगराध्यक्ष अतुल तराळे, आर्वीचे उपविभागीय महसूल अधिकारी प्रकाश शर्मा, हिंगणघाटचे समाधान शेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, समितीचे सदस्य सचिव तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, प्रणव जोशी, आॅटोचालक संघटनेचे देवा निखाडे, डिलर असोसिएशनचे राठी, व्यापारी असोसिएशनचे काशीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
वाहतूकीच्या नियमाचे पालन आणि सुरक्षित वाहन चालविण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह प्रभावीपणे राबवावा. या सप्ताहात लोकांना विविध माध्यमांद्वारे माहिती देत जनजागृती करावी. जिल्ह्यातील आॅटो चालकांना ई-रिक्षा चालविण्याबाबत प्रोत्साहित करावे. सेवाग्राम रेल्वे स्टेशन ते वर्धा शहर व बसस्थानक ते वर्धा शहर प्रिपेड आॅटो प्रणाली सुरू करावी, असेही याप्रसंगी खा. रामदास तडस म्हणाले.
ई-रिक्षा चार्जिंगसाठी सोलर चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येईल. आॅटो चालकांनी ई-रिक्षा घेतल्यास त्यांना नि:शुल्क चार्जिंग करू देण्यात येईल. रस्ता निधीमधून ५ टक्के निधी हा शहरातील पी-१, पी-२ पार्कींग प्रतिबंधीत रस्ता, एकेरी मार्ग याचे फलक उभारणे व गतिरोधक उभारण्यासाठी खर्च करावे, अशा सूचना बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात. आॅटो चालकांनी मीटर लावणे अनिवार्य आहे. शासन नियमाप्रमाणे दर आकारण्यास आॅटो चालकांना बाध्य करावे. मीटर न लावणाºया आॅटो चालकांचे परवाने रद्द करावे, असे स्पष्ट निर्देशही जिल्हाधिकाºयांनी परिवहन विभागाला दिलेत. महामार्गावर हॉटेल आणि धाब्याच्या ठिकाणी ट्रकचालक ट्रक उभे करतात. बहूदा ते रस्त्यावरच वाहन उभे करतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. यासाठी सालोड हिरापूर येथे ट्रक टर्मिनल तयार ूूूूूकरण्याच्या सूचना सुद्धा जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यात राज्य महामार्गाची संख्या वाढल्यामुळे पोलीस चौकी उभारण्यासाठी प्रस्ताव पाठवावा, असे यावेळी प्रणव जोशी यांनी सांगितले.