शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात अल्पवयीन मुली सुरक्षित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:51 IST

Wardha : कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी

वर्धा : एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात असताना लहान मुली विकृतांच्या वासनेच्या बळी पडत आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे सर्व गुन्हे जलदगती न्यायालयात चालवून कठोर शिक्षेची तरतूद करण्याची मागणी वारंवार होत आहे. शहरातदेखील वारंवार विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे रिक्षा चालक, परिचयातील व्यक्तींकडून गैरप्रकार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य, विनयभंगासह अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. २०२४ मध्ये ५४ गुन्ह्यांची नोंद झाली. याव्यतिरिक्त अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीचे ५० वर गुन्हे दाखल झाले.

९५ टक्के गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास पूर्ण अल्पवयीनांसोबत झालेल्या गैरप्रकाराच्या गुन्ह्यांमध्ये जवळपास ९५ टक्के गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन आरोपींना अटक झाली आहे. अशा गुन्ह्यांत महिला अधिकारी व बाल कल्याण समितीच्या सदस्यांसमोर जबाब नोंदवून प्रक्रिया पार पाडावी लागते.

७० टक्के परिचितच अल्पवयीन मुली, मुलांसोबत होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये ७० टक्के आरोपी हे परिचयातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही पालकांचीच आहे.

सोशल मीडिया ठरतेय कारणीभूत... महिला व मुलींवर अत्याचार होण्यात बऱ्याच प्रमाणात सोशल मीडिया जबाबदार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा व मुलगी जवळ येतात. याची भनक पालकांना लागत नाही. अल्पवयीन मुलींना फारशी समज राहत नसल्याने त्या मुलांकडून टाकण्यात आलेल्या बनावट प्रेमाच्या पाशात अडकतात. त्यानंतर प्रेमाच्या आड शारीरिक शोषण केले जाते. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना आठ दिवसांतून एकदा घडते. काही पालक तर पोलिसात तक्रार देण्यासही जात नसल्याचे दिसून आले आहे. यातून या प्रकारांना आणखीच बळ मिळत असल्याचे दिसते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा