युवक देशामधील परिवर्तनाचा शिल्पकार

By Admin | Updated: February 3, 2015 23:00 IST2015-02-03T23:00:40+5:302015-02-03T23:00:40+5:30

देशातील परिवर्तनाला आजचा युवक जबाबदार असून तोच खरा उद्याचा शिल्पकार आहे़ युवकांनी त्यांचा एक तास देशासाठी तर एक तास स्वत:च्या प्रकृतीसाठी द्यावा,

Architect of innovation in youth country | युवक देशामधील परिवर्तनाचा शिल्पकार

युवक देशामधील परिवर्तनाचा शिल्पकार

रामदास तडस : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी येथे वादविवाद स्पर्धा
वर्धा : देशातील परिवर्तनाला आजचा युवक जबाबदार असून तोच खरा उद्याचा शिल्पकार आहे़ युवकांनी त्यांचा एक तास देशासाठी तर एक तास स्वत:च्या प्रकृतीसाठी द्यावा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे खासदार रामदास तडस, यांनी केले़ स्थानिक औषधनिर्माण शास्त्र शिक्षण व संशोधन संस्था बोरगाव (मेघे) यांच्यावतीने वादविवाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये रविवारी ते बोलत होते़
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा गत १० वर्षांपासून ही विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येते़ या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ़ प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आले होते. वादविवाद स्पर्धेचा यंदाचा विषय ‘सद्यस्थितीत द्विपक्षीय लोकशाहीमुळे देशाची प्रगती शक्य आहे’ हा होता़ या स्पर्धेमध्ये विदर्भातील एकूण २० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदविला. ही स्पर्धा सांघिक व सामूहिक गटात आयोजित करण्यात आली होती.
वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक वितरण खा.तडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिथी म्हणून माजी खासदार दत्ता मेघे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ़ नितीन धांडे होते. संस्थेचे कोषाध्यक्ष पंकज देशमुख, प्राचार्य येवले, सचिव युवराजसिंग चौधरी, परीक्षक प्रा़ मांडवगडे, ददगाळे मंचावर उपस्थित होते़
प्रास्ताविकामध्ये डॉ़ येवले यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल महाविद्यालयास नुकत्याच प्राप्त झालेल्या नॅकच्या ‘अ’ श्रेणी बदल माहिती देत वादविवाद स्पर्धेची पार्श्वभूमी विषद करून स्पर्धेच्या काळाची माहिती दिली.
वादविवाद स्पर्धेचे पहिले सांघिक पारितोषिक अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती या महाविद्यालयाच्या सचिन चंदनखेडे व आशिष कांबळे यांनी पटकावले. त्यांना प्रा़ राम मेघे स्मृती फिरता चषक प्रदान करण्यात आला़
सांघिक पारितोषिकाचे दुसरे मानकरी एल.आऱटी़ कॉलेज आॅफ कॉमर्स अकोलाचे सुबोध धुरंधर व स्वप्नील इंगोले यांना फिरता चषक देण्यात आला़
उत्कृष्ठ वादविवाद पटुचे पारितोषिक शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथील सचिन चंदनखेडे, दुसरे पारितोषिक औषधनिर्माणशास्त्र शिक्षण व संशोधन संस्था, वर्धाची प्रिती शेंडे व तिसरे पारितोषिक एल़आऱटी़ कॉलेज आॅफ कॉमर्स अकोलाचे सुबोध धुरंधर यांनी पटकावले.
वादविवाद स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला वर्धेतील प्रशांत जाचक, इक्राम हुसेन, हिंदी विश्वविद्यालयाचे प्रा़ अन्ववर हुसेन, मिरगे यांच्यासह गणमान्य व्यक्ती व आमंत्रित उपस्थित होते़ संचालन प्रा़ मनीषा पुराणिक यांनी केले तर आभार प्रा़ जी़एस़ तेलतुंबडे यांनी केले़
कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संस्थेच्या कर्मचाऱ्यांसह साऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Architect of innovation in youth country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.