शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:04 PM

शहरालगत असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या व शहरातील नागरिक, प्रवासी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्थानकावर शासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा सर्व्हिस सुरू करून आॅटोचालकांच्या मनमानीला लगाम लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांना त्रास : प्रीपेड सर्व्हिस सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगत असलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर आॅटोचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे बाहेर राज्यातून येणाऱ्या व शहरातील नागरिक, प्रवासी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रेल्वे स्थानकावर शासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा सर्व्हिस सुरू करून आॅटोचालकांच्या मनमानीला लगाम लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.सेवाग्राम रेल्वे स्थानक वर्धा शहराच्या बाहेर भागात आहे. या भागात सायंकाळनंतर फारशी वर्दळ राहत नाही. शिवाय दिवसाही रेल्वे गाड्यांच्याच वेळेत येथे वर्दळ दिसून येते. या रेल्वे स्थानकावर मध्य व दक्षीण भारतातून येणाºया अनेक रेल्वे गाड्या थांबतात. दरररोज साधारणत: २० ते २५ गाड्यांना येथे थांबा आहे. देश-विदेशातून येणारे अनेक पर्यटक सेवाग्रामसाठी येथेच उतरतात. येथील आॅटोचालक अतिशय मग्रुर असून त्यांची मनमानी चालली आहे. दीडशे ते दोनशे रूपयाच्या कमी भाडे ते घेतच नाही. या ठिकाणी आॅटोशिवाय दुसरी व्यवस्था नसल्याने व आॅटोचालक एकत्रिरित्या प्रवाश्यांना लुटण्याचे काम करीत असल्याने नाईलाजास्तव प्रवाशांना आॅटोचालकांचा सहन करावे लागते. येथील आॅटोचालक दिवसभर येथे पत्ते पिसत राहतात. गाडी आले की प्रवाशांच्या वयाचेही भान न ठेवता त्यांच्यासोबत भावबाजीवरून वाद घालत असतात. ज्येष्ठ नागरिक, प्रवाशी यामुळे त्रस्त झाले आहे.रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे आॅटोचालकांची मनमानी वाढली आहे.चोकोलिंगम जिल्हाधिकारी असताना निश्चित केले होते दरया रेल्वे स्थानकावर रात्री बेरात्री रेल्वे गाड्या येतात. प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर लुट आॅटोरिक्षा चालक करिता असतात. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. चोकोलिंगम वर्धेचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी या रेल्वे स्थानकावरील आॅटोरिक्षा स्टॅँडवर उभ्या राहणाऱ्या आॅटोचे विविध ठिकाणचे दर निश्चित करून दिले होते. यापेक्षा अधिक पैसे घेणाºयांवर कारवाईचा दणकाही दिला होता. त्यामुळे प्रवाशांची लूट थांबली होती. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे मनमानी सुरू आहे.वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षशहराच्या अनेक चौकांमध्ये वाहनचालकांना पकडण्यासाठी सक्रिय राहणारे वाहतुक पोलीस सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या भागात भटकतानाही दिसत नाही. येथे वाहतुक पोलीस नसल्याने आॅटो चालकांचेच राज्य आहे. त्यांनी मनमानी दर आकारणी सुरू केली आहे. महिला प्रवाशांनाही घाणेरड्या भाषेत हे आॅटोचालक शिवीगाळ करतात. येथे वाहतुक पोलीस तैनात करून आॅटोचालकांची मनमानी थांबविण्याची गरज आहे.प्रीपेड आॅटो केंद्र सुरू करानागपूरसह देशाच्या विविध मोठ्या रेल्वे स्थानकावर प्रीपेड आॅटोरिक्षा स्टॅन्ड चालविले जाते. सेवाग्राम रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाने प्रीपेड आॅटोरिक्षा स्टॅन्ड सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशी मित्र मंडळाने केली आहे. येथून सीट प्रमाणे बस स्टॅन्डसाठी आॅटोरिक्षा सोडले जातात. त्या आॅटोत किमान दहा ते पंधराच्यावर प्रवाशी बसविले जातात व त्यांच्यासोबतही मनमानी केली जाते. येथील आॅटोचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आहे.