शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

अवास्तव देयके पाठवून महावितरणची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 5:00 AM

लॉकडाऊनच्या काळात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीतील घरगुती वीज आकारणीची देयके देवळी व परिसरातील ग्राहकापर्यंत पोहोचलीच नाही. कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे ग्राहकांच्या घरापर्यंत दर महिन्याला जात मीटर रिडींग न घेतल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. कोरोना संक्रमणातच महावितरणची देखभाल व दुरुस्ती कामे सुरू असताना ग्राहकांच्या मीटरचे रिडींग न घेण्यामागचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

ठळक मुद्देग्राहक आंदोलनाच्या पवित्र्यात : तीन महिन्यांचे एकमुस्त देयक दिल्याने सर्वसामान्याची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : लॉकडाऊनच्या कालावधीत वीजमहावितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांच्या घरगुती मीटरचे रिडींग न घेता त्यांच्या हाती तीन महिन्याचे एकमुस्त देयक थोपविण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. त्यातच तीन महिन्यांच्या देयकाचे युनिट एकत्र करून व त्यानुसार विजेच्या आकारणीचे दर ठरवून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे गोंधळलेल्या ग्राहकांनी महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवून तसेच संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचा जाब विचारून आंदोलनाची भूमिका घेतली आहे.लॉकडाऊनच्या काळात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीतील घरगुती वीज आकारणीची देयके देवळी व परिसरातील ग्राहकापर्यंत पोहोचलीच नाही. कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे ग्राहकांच्या घरापर्यंत दर महिन्याला जात मीटर रिडींग न घेतल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. कोरोना संक्रमणातच महावितरणची देखभाल व दुरुस्ती कामे सुरू असताना ग्राहकांच्या मीटरचे रिडींग न घेण्यामागचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. महावितरणने एप्रिल महिन्यापासून वीज आकारणीचे नवीन दर निर्धारित केले आहे. या दरानुसार १०० युनिटपर्यंत प्रतियुनिट ३ रुपये ४६ पैसे व यानंतर ३०० युनिटपर्यंत ७ रुपये ४३ पैसे याप्रमाणे टप्प्याटप्प्याने एक हजार युनिटपर्यंत वीज आकारणी वाढीव दर लावून स्लॅब टाकण्यात आले. त्यामुळे दर महिन्याला सरासरी १०० युनिटपर्यंत वीज खर्च करणाºया घरगुती ग्राहकाला तीन महिन्यांचे ७०० ते ८०० युनिटचे देयक देऊन तसेच याप्रमाणे वीज आकारणीचे दर ठरवून विजेची देयके देण्यात आली. त्यामुळे नागरिकांत गोंधळाची स्थिती निर्माण होऊन महावितरणच्या लूटमार धोरणाबाबत रोष व्यक्त होत आहे. कोरोना महामारीच्या संक्रमणात कामधंद्याअभावी आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांचे या कंपनीने कंबरडेच मोडले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.लॉकडाऊन काळातील वीज देयक माफ करापुलगाव : महाराष्टÑ वीज वितरण कंपनीने कोरोनाच्या काळात ग्राहकांना भरमसाठ वीजबिले दिली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व शासनाने देयकातील अधिभार, वहन कर व स्लॅब कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन पुलगाव येथे सहाय्यक अभियंता पुरी व नायब तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळा शहागडकर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष श्याम देशमुख, राजेश पाटणकर, कॉँग्रेसचे अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर, तसेच डॉ. विजय राऊत, नाना माहुरे, नरेश ठाकूर, विनोद बाभुळकर उपस्थित होते.महावितरण कंपनीचे वतीने अव्वा सव्वा विद्युत बिले पाठवून घरगुुती ग्राहकांची लूट केली जात आहे. याबाबत ग्राहकमंच, वीज नियामक मंडळ यांच्याकडे याबाबतची तक्रार नोंदविली जाणार आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या सोबत बोलून बिल आकारणीचे प्रकरण त्यांचे लक्षात आणून दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची या बिलामुळे अडचण होणार आहे.- रामदास तडस, खासदार,वर्धा .

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज