शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अधिकाऱ्यांची नियोजनशून्यता; तालुक्यात जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:39 IST

कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे.

ठळक मुद्देअनधिकृत मोटरपंपाचा भार : नारा- २२ व कारंजा येथील पाणीपुरवठा योजनेचे भवितव्य धोक्यात

अरुण फाळके।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : कारंजा तालुक्यात एकमेव खैरी जलाशय असून या जलाशयात सध्या २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. असे असतानाही सिंचन विभागाच्या नियोजनशुन्यतेमुळे ५० हून अधिक अनधिकृत मोटरपंपव्दारे पाणी उपसा सुरु आहे. हा उपसा असाच सुरु राहिला तर फेब्रुवारी व मार्च महिन्यातच कारंजावासींयांच्या घशाला कोरड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कारंजाचा समावेश असल्याने संभावीत पाणी टंचाई लक्षात घेता ३० आॅक्टोबरला संबंधित विभागाची बैठक पार पडली. या बैठकीला जलाशयाचे अधिकारी, तहसीलदार व वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी या जलाशयावर ५० हून अधिक मोटरपंप अनधिकृतरित्या सूरू असून त्यांच्यावर कारवाईकरीत ते बंद केले जाईल, असे आश्वासन या बैठकीत दिले होते. पण, अधिकाऱ्यांची ही आश्वासने कु ठे गडप झाली हे कळायला मार्ग नाही.पाणी कमी असताना धरणाच्या पश्चिमेकडील कालवा खुला करुन पाणी सोडण्यात आले. जी गावे प्रत्यक्ष धरणात गेली त्या खैरी व इतर गावांना हिवाळी पीकांची लागवड करु नका. पाणी दिल्या जाणार नाही असे सांगण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचे भविष्यकालीन संकट लक्षात घेता, येथील काही गावांनी हिवाळी पिकांची लागवड केली नाहीत. पण इतर दूरच्या गावांना मात्र कालव्याव्दारे पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रताप, संबंधित अधिकाºयांनी केल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे.कालव्याचे पाणी सोडल्यामुळे जलाशयावर अवलंबून असणाºया नारा-२२ गावाची पाणीपुरवठा योजना आणि कारंजा शहराची पाणी पुरवठा योजना मार्चमध्ये बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या कालव्याव्दारे पाणी सोडल्या गेले तो कालवा फुटल्याने पाणी इतरत्र पसरुन वाया जात आहे. दुष्काळी परिस्थिती हा पाण्याचा अपव्यय चिंतेचा विषय ठरत आहे.जलाशय ठरले शेतकऱ्यांसाठी वरदानयेथील खैरी धरण माती व सिमेंटचे असून या धरणाचे पाणलोट क्षेत्र १७६.१२ चौ.मी.मीटर आहे. धरणाची उंची २५.११ मीटर असून लांबी ८२७ मीटर आहे. तसेच पाणी साठवणूक क्षमता २६ दशलक्ष घनमीटर असून यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे धरण भरले नाही. नेहमी ओव्हर फ्लो होणारे धरण यावर्षी केवळ ६० टक्केच भरले. या धरणामुळे आष्टी तालुक्याच्या १४ गावांतील ३ हजार ६९० हेक्टर व कारंजा तालुक्याच्या १३ गावांतील १ हजार ५०० हेक्टर जमिनीला सिंचनाखाली आणले. सध्या २६ टक्केच जलसाठा आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई