तत्काळ सेवेसाठी अपात्र डॉक्टरची नियुक्ती
By Admin | Updated: November 20, 2014 22:56 IST2014-11-20T22:56:39+5:302014-11-20T22:56:39+5:30
शासन मान्यता नसलेल्या ईलेक्ट्रो होमिओपॅथी धारकाची व ज्याच्यावर आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर म्हणून कारवाई केली व सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, अशा व्यक्तीची इमर्जन्सी मेडिकल आॅफिसर

तत्काळ सेवेसाठी अपात्र डॉक्टरची नियुक्ती
अरविंद काकडे - आकोली
शासन मान्यता नसलेल्या ईलेक्ट्रो होमिओपॅथी धारकाची व ज्याच्यावर आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर म्हणून कारवाई केली व सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, अशा व्यक्तीची इमर्जन्सी मेडिकल आॅफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
१०८ डायल करा, अॅम्बुलन्स तुमच्या दारी, अशी शासनाची योजना आहे. ही योजना राबविताना शासनाने एक प्रशिक्षित डॉक्टर, सहाय्यक व सर्व सोईयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. २४ तास असलेल्या समाजोपयोगी योजनेत शासन मान्यता असलेल्या एमबीबीएस किंवा बीएएमएस डॉक्टरचीच नेमणूक करणे गरजेचे आहे. येथे मात्र या नियमाला हरताळ फासण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. आंजी (मोठी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापुढे विशाल गाडेगोणे यांचे खासगी रुग्णालय आहे. गाडेगोणे हे ईलेक्ट्रो होमीओपॅथी धारक असून त्याला शासनाची मान्यता नाही. त्यामुळे त्यांच्यावर डॉ. रविकांत झोडे (वैद्यकीय अधिकारी आंजी) यांनी बोगस डॉक्टर शोध मोहिमेत पोलीस कारवाई केली होती. या गुन्ह्यात त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत काढावे लागले होते व सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हा सर्व प्रकार आरोग्य विभागाला माहिती असताना गाडेगोणे यांची इमर्जन्सी मेडिकल आॅफिसरपदी नियुक्ती झाल्याने सर्वत्र चर्चा होत आहे.