शिकाऊ अभियंत्यांनी बनविले साईच्या नऊ गुरुवार व्रतावर अॅप
By Admin | Updated: November 18, 2014 23:00 IST2014-11-18T23:00:23+5:302014-11-18T23:00:23+5:30
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच काही वेगळं करायचं असा ध्यास असलेले काही मित्र मैत्रिणी एकत्र आले आहेत. अनेक उपक्रम राबवून आपली सामाजिक जाणीव जागृत ठेवण्यासाठी त्यांनी ‘रास’ या ग्रुपची

शिकाऊ अभियंत्यांनी बनविले साईच्या नऊ गुरुवार व्रतावर अॅप
वर्धेतील पहिलाच प्रयत्न : हिंदी भाषेत सहज सोपे आणि सुटसुटीत
पराग मगर - वर्धा
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच काही वेगळं करायचं असा ध्यास असलेले काही मित्र मैत्रिणी एकत्र आले आहेत. अनेक उपक्रम राबवून आपली सामाजिक जाणीव जागृत ठेवण्यासाठी त्यांनी ‘रास’ या ग्रुपची निर्मिती केली. आपल्या शिक्षणाचा लोकांसाठी उपयोग व्हावा ही इच्छा मनात घर करून होती. त्यातच सगळ्यांची साईवर निस्सिम श्रद्धा. त्यामुळे अँंड्रॉईड मोबाईल अॅप बनविण्याचे प्रशिक्षण घेतानाच साईभक्तांसाठी काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेत अवघ्या पंधरा दिवसांत ‘साई भक्ती: ९ गुरुवार व्रत’ हे अॅप तयार करून वर्धेच्या साईमंदिरात साईला अर्पण केले. अॅप बनविण्याचा वर्धेतील हा पहिलाच प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
तंत्रज्ञान जगाला सावरू लागले आहे. त्यामुळे त्याचाच उपयोग करून आपणही जगाला काहीसं सावरावं या उद्देशांने संपूर्ण युवा पिढी तंत्रज्ञानाची कास धरत आहेत. हिच कास धरत वर्धा जिल्ह्यात एका अभियांत्रिकी महाविद्यालयातचे शिक्षण घेत असलेल्या सत्यम गुर्वे, विपीन पाटील, नितीन डवाले, अनघा वैद्य, पूजा इंदोरिया, अपूर्वा वाघमारे, मनीषा रिठे, वैभव इरुटकर, प्रणिता सुरकार या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन रास (रॉकस्टार अॅप्स अॅन्ड सॉफ्टवेअर सोल्यूशन) हा ग्रूप तयार करीत सामाजिक उपक्रम सुरू केले. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी थेट हैदराबाद गाठून अॅप्स बनविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. सत्यम हा त्यांचा लिडर असे म्हणता येईल. साईवर श्रद्धा असल्याने न चुकता दर गुरुवारी हा ग्रूप वर्धेतील साई मंदिरात यायचा. त्यामुळे आपण घेत असलेल्या शिक्षणाचा साईभक्तांसाठी काही तरी उपयोग व्हावा या विचारातून ‘साई भक्ती: ९ गुरुवार व्रत’ या अॅपची संकल्पना सुचली. याआधी त्यांनी साईबाबा संदर्भात कुठले अॅप्स आहेत याचा तपास केला असता व्रतांसंदर्भात कुठलेही अॅप्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी यावर काम सुरू केले. काहीच दिवसांपूर्वी साई मंदिरात या अॅपचे लाँचिंग करण्यात आले. याचा लाभ जिल्ह्यातील साईभक्तांना होईन, असे हा अॅप्स तयार करणाऱ्या भावी अभियंत्यांचे म्हणणे आहे.