शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

व्हॉट्सॲपवर एपीके फाइल आली अन् खाते साफ करून गेली ! ऑनलाइन पैसे उकळण्यासाठी नवी शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 17:18 IST

Wardha : ठगबाजांनी शोधले नवे जाळे शासकीय योजनांच्या नावाने व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ठगबाजांकडून ऑनलाइन पैसे उकळण्यासाठी रोज नवी शक्कल लढवली जाते. आता शासकीय योजनांच्या नावाने एपीके फाइल्स व्हॉट्सॲपवर व्हायरल केल्या जात आहेत. अशी फाइल आपल्या परिचयातील व्यक्तीकडून व्हायरल होऊ शकते. ओळखीच्या व्यक्तीने शासकीय योजनेची माहिती पाठवली म्हणून आपला विश्वास बसतो. कोणतीही खातरजमा न करता थेट ही फाइल डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला जातो, यातच फसगत होते. मागील ११ महिन्यांत सायबरकडे ४० ते ५० वर तक्रारी दाखल असून, यात सुमारे २० ते २२ लाखांवर फसवणूक झाल्याची माहिती आहे.

एपीके फाइल्स इन्स्टॉल करताच मोबाइलचा पूर्ण अॅक्सेस ठगबाजाकडे जातो. कोणतीही फाइल डाऊनलोड करण्यापूर्वी ती कोणती फाइल आहे, हे तपासून घ्यावे. ज्या ओळखीच्या व्यक्तीने असा माहितीपर मेसेज, लिंक पाठवली, त्याच्याकडे याबाबत खातरजमा करावी. त्याला कुठून मिळाली, या महितीचा स्रोत काय हे स्पष्ट करूनच अशा फाइल्स मोबाइलमध्ये उघडण्याचा प्रयत्न करावा. 

ठगबाज एपीके फाइल पाठवून ती मोबाइल वापरणाऱ्याने इन्स्टॉल केली की, ठगबाज त्या मोबाइलचा ताबा घेतात. याची माहिती मोबाइल वापरणाऱ्याला होत नाही. त्याच्या खात्यातून पैसे काढले तरी त्याचे मेसेज दिसत नाही, अशी व्यवस्था करून ठगबाज संपूर्ण बँक खाते रिकामे करू शकतात. असे फसवणुकीचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या लिंक, फाईल्सपासून सावध राहावे. 

अशी घ्या खबरदारी 

  • फाइल डाऊनलोड अथवा इन्स्टॉल करून उघडू नये. फाइल उघडण्यापूर्वी ती कोणती आहे हे ओळखण्याची सोपी पद्धत आहे. 
  • जेपीजी लिहिले असेल तर ती फोटो फाइल असते, एमपी ४ लिहिले असेल तर ती व्हिडीओ फाइल, डीओसीएस व पीडीएफ असेल तर ही डॉक्युमेंट फाइल असते. या डाऊनलोड केल्यास कोणताच धोका होत नाही.
  • मात्र, ज्या फाइलखाली एपीके लिहिले असते ती फाइल डॉक्युमेंट नसून अॅप्लिकेशन असते. यापासून मोबाइल हॅक होण्याचा धोका निर्माण होतो. एकदा मोबाइल हॅक झाला की पुढचे संकट ओडवते.

या आहेत शासकीय योजना पीएम किसान लिस्ट, घरकुल योजना, सीएससी सेंटर, एसबीआय रिवॉर्डस्, एमजीबी रिवॉर्डस्, सोलार पंप लिस्ट अशा विविध योजनांचे नाव वापरून त्याचे माहिती पत्रक पाठवत आहोत, असा देखावा केला जातो. ती एपीके फाइल असते. तिला इन्स्टॉल केल्यानंतर ठगबाज तुमचा मोबाइल सहज हाताळतो. तुमच्या मोबाइलवरून इतरांना अशी एपीके फाइल पाठवली जाते. या जाळ्यात एकाला अडकवल्यानंतर काही मिनिटांत अनेकांना फसवता येते.

चुकून एपीके इन्स्टॉल केल्यास हे कराचुकून एपीके फाइल इन्स्टॉल झाली व मोबाइल हँग झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने मोबाइलचे इंटरनेट बंद करा. इन्स्टॉल केलेली एपीके फाइल, ॲप तत्काळ अनइन्स्टॉल करा. काहीवेळ फोन बंद करा, वेळ मिळताच मोबाइल फॉरमेट केल्यास पुढचा धोका टाळता येतो.

अन् बँक खाते होते साफ मोबाइलवरील फोन पे, गुगल पे, पेटीएम, ॲमेझॉन यासारखे ॲप एपीके ॲप्लिकेशनमुळे सहज हॅक करून बँक खाते रिकामे होते. तसेच बँकेतून पैसे कमी झालेले मेसेज येतात, ते सुद्धा हॅकर परस्पर डिलिट करून टाकतात. त्यामुळे आपल्याला पैसे काढल्याचा मेसेज दिसत नाही.

११ महिन्यांत ५० वर तक्रारीसध्या सायबर भामट्यांकडून सोशल मीडियावर विविध लिंक्स, एपीके फाइल पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. अशातच जिल्ह्यातील नागरिकांना एपीके फाइल्स पाठवून गंडवल्याच्या सुमारे ४० ते ५० तक्रारी सायबरकडे दाखल असून, या प्रकरणात सुमारे २० लाखांहून अधिकची रक्कम भामट्यांनी परस्पर काढून घेत फसवणूक केली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाfraudधोकेबाजी