शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

हिवरा (तांडा)तील कोरोना ‘ओपनिंग’ची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 05:00 IST

गतवर्षी राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. मात्र, वर्धा जिल्हा यापासून दूर होता. प्रशासनानेही विषाणूला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या; पण अखेर १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अख्ख्या गावात कंटेन्मेंट झोन तयार करून गाव दोन दिवसांसाठी सील करण्यात आले होते.

ठळक मुद्देवर्षभरात ४१ हजारावर रुग्ण : १० मे २०२० रोजी मृत्यूपश्चात आढळली होती पहिली कोरोनाबाधित महिला

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोनामुक्त असलेल्या वर्धा जिल्ह्यात १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील महिलेचा मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निघाला अन् आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली होती. रुग्ण निघाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रस्त्यांवरही शुकशुकाट होता. आता वर्षभरात तब्बल ४१  हजारांवर रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ३३ हजार ८३६ जणांनी कोविडवर मात केली, तर १०१६ जणांचा कोरोनाने बळी घेतला. गतवर्षी राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. मात्र, वर्धा जिल्हा यापासून दूर होता. प्रशासनानेही विषाणूला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या; पण अखेर १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अख्ख्या गावात कंटेन्मेंट झोन तयार करून गाव दोन दिवसांसाठी सील करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांसाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. मृत महिलेचा पती दारूविक्रीचा व्यवसाय करीत असल्याने ती इतर गावांतही दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले होते. एकीकडे वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असताना दुसरीकडे सावंगी येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेला वाशिम जिल्ह्यातील ६४ वर्षीय रुग्णही पॉझिटिव्ह आढळून आल्याचे समजल्याने आणखी भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले होते.  त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. विशेष म्हणजे वर्षभरात आढळलेल्या रुग्णांच्या बरोबरीने एकट्या मे महिन्यात रुग्ण आढळून आले. पहिल्या लाटेतील मे महिन्यापेक्षा दुसऱ्या लाटेतील मे महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत, तसेच मृत्यूदरातही कमालीची वाढ झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.  दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील एक हजारांवर गावांना कोरोनाने विळखा घातला आहे. मृत्यूचे प्रमाणही अलीकडे वाढत चालले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०१६ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३३ हजार ८३६ जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

‘ती’च्या अंत्ययात्रेला उसळली होती गर्दी अन् उडाली झोप महिलेच्या मृत्यूपश्चात तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला होता. अशातच तिच्या अंत्यविधीला चांगलीच गर्दी उसळली होती. त्यामुळे अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांचा शोध घेऊन तपासणी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. प्रशासनाकडून हिवरा गावापासून तीन कि.मी. अंतरावरील हर्रासी, राजनी, जामखुटा, पाचोड, बेलारा तांडा या गावांचा परिसरही सील करण्यात आला होता, तसेच अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांना होम, संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस