अंनिस व आयटकचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:30 PM2018-02-24T22:30:59+5:302018-02-24T22:30:59+5:30

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर तसेच ज्येष्ठ विचारवंत आयटकचे पदाधिकारी डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास थंडावला आहे.

Anis and ankle dam | अंनिस व आयटकचे धरणे

अंनिस व आयटकचे धरणे

Next
ठळक मुद्देडॉ. दाभोळकर व डॉ. पानसरे यांच्या हत्येचा निषेध

ऑनलाईन लोकमत
वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर तसेच ज्येष्ठ विचारवंत आयटकचे पदाधिकारी डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास थंडावला आहे. या विरोधात निषेध म्हणून महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाराष्ट्र अंनिस आणि आयटकच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शहा यांनी स्वीकरले.
डॉ. नरेंद्र दाभोळक व डॉ. गोविंद पानसरे यांच्यावर सनातन तसेच हिंदु जनजागृती यांच्या साधकांनी गोळ्या झाल्याचे प्रतिज्ञापत्र सीबीआयाने उच्च न्यायालयात सादर केले. या दोन्ही संस्थेचे साधक विनोद तावडे आहेत. या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार व त्याचा साथीदार यांना अटक होवूनही तपास भरकटल्याने न्यायालयाने या दोघांनाही जामीन दिला. न्यायालयाने सीबीआय, सीआयडी राज्य सरकार, सरकारी वकील यांच्यावर ताशेरे ओढले. मात्र तपासाला अजूनही योग्य दिशा मिळाला नाही.
त्यानंतर एम.एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. या हत्यांत मडगांव बॉम्बस्फोटात फरार असलेले व एनआयएनने फरार घोषित केलेले सनातनचे साधक सारंग अकोलकर, प्रवीण निंबकर, रूद्र पाटील, जयप्रकाश हेगडे असल्याचे समोर आले. फक्त विनोद तावडे व समीर गायकवाड या साधकांना अटक झाली. या पलिकडे काहीच कार्यवाही झाली नसल्याने निषेध नोंदविण्यात आला. निवेदन देताना दिलीप उटाणे, गजेंद्र सुरकार, मनोहर पचारे, वामनराव भेंडे, गोवर्धन टेंभुर्णे, सुधीर पांगुळ, सुनील ढाले, राजेश इंगोले, गोपाल काळे, मैना उईके, वंदना कोळमकर, मंगला इंगोले उपस्थित होते.

Web Title: Anis and ankle dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.