अॅनिमेशनवर आधारित ‘फॅमिली व्हीजन’ खास युवक-युवतींकरिता
By Admin | Updated: July 25, 2014 00:00 IST2014-07-25T00:00:42+5:302014-07-25T00:00:42+5:30
लोकमत युवा नेक्स्ट व कॉलेज आॅफ बायोइंजिनिअरींग अॅण्ड रिसर्च सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने युवांसाठी एक अभिनव उपक्रम स्थानिक दादाजी धुनिवाले सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.

अॅनिमेशनवर आधारित ‘फॅमिली व्हीजन’ खास युवक-युवतींकरिता
वर्धा : लोकमत युवा नेक्स्ट व कॉलेज आॅफ बायोइंजिनिअरींग अॅण्ड रिसर्च सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने युवांसाठी एक अभिनव उपक्रम स्थानिक दादाजी धुनिवाले सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४ वाजता होणारा ‘फिमिली व्हीजन’ हा कार्यक्रम फिल्म मेकींग व डिझायनिंगवर आधारित आहे.
सदर कार्यक्रम मुंबई येथील प्रसिद्ध चित्रकार, अॅनिमेशन फिल्म मेकर तथा दी बॉम्बे आॅर्ट सोसायटीचे माजी अध्यक्ष विजय राऊत, त्यांचे सहकारी व्हाईस डिझायनर सुधीर वानखेडे आणि त्यांची चमू मिळून सादर करणार आहे़ आज मेडिकल, इंजिनिअरिंंग, बीए, बीएससी या पारंपरिक शिक्षणासोबतच काळाच्या आघात मनोरंजन क्षेत्रातील जे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे, त्याचा उपयोग करून मनोरंजन तसेच प्रगती साधता येऊ शकते. याबाबतचे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत़ त्यांचे प्रात्यक्षिकासह मनोरंजन करणारे प्रशिक्षण या प्रयोगाने दिले जाणार आहे.
आज देशात अॅनिमेशन फिल्म निर्मिती तसेच लाईव्ह फिल्म निर्मिती यासाठी ज्या गोष्टींचा अभ्यास लागतो, उदा. कथाकथन, अभिनय ड्रार्इंग आणि पेन्टींग, संगीत, तंत्रज्ञानातील विशेष ईफेक्ट याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
वर्धेकरांसाठी करिअरच्यादृष्टीने विचार करायला लावणारे असे हे अद्भूत सादरीकरण वर्धेत पहिल्यांदाच होत आहे. ही मनोरंजनाची एक पर्वणीही आहे. सर्व युवक, युवतींनी सदर आयोजनाला उपस्थित राहून मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्यावा़ कार्यक्रम वेळेवर सुरू होईल तसेच सदर कार्यक्रम नि:शुल्क आहे.
अधिकाधिक युवक, युवतींनी आपल्या मित्र परिवारासह कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या अधिक माहितीकरिता लोकमत युवा नेक्स्ट संयोजक रंजित कांबळे यांच्याशी या ७७०९४३८५४३ क्रमांकावर संपर्क साधावा.(उपक्रम प्रतिनिधी)