शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी केरळला नेली जात होती जनावरे; पोलिसांनी उधळला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

धडक कारवाई मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नागपूर-हैदराबाद मार्गावरील दारोडा टोल नाका परिसरात करण्यात आली. गोपनीय माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी हैदराबाद मार्गावरील दारोडा शिवारात नाकाबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. दरम्यान, नागपूरकडून हैदराबादच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरला थांबवून पाहणी केली असता त्यात निर्दयतेने कोंबलेल्या अवस्थेत मोठ्या संख्येने जनावरे आढळून आली.

लोकमत न्यूज नेटवर्क वडनेर : जनावरांना कंटेनरमध्ये निर्दयतेने कोंबून त्यांना कत्तलीसाठी केरळ राज्यात नेले जात होते; पण वडनेर पोलिसांनी सदर माहिती मिळताच नागपूर-हैदराबाद मार्गावर नाकेबंदी करीत धडक कारवाई करून जनावर तस्करांचा हा डावच उधळून लावला. पाेलिसांनी या कारवाईत एकूण २० जनावरे, तसेच जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा कंटेनर जप्त केला आहे. ही धडक कारवाई मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नागपूर-हैदराबाद मार्गावरील दारोडा टोल नाका परिसरात करण्यात आली. गोपनीय माहिती मिळताच वडनेर पोलिसांनी हैदराबाद मार्गावरील दारोडा शिवारात नाकाबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. दरम्यान, नागपूरकडून हैदराबादच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरला थांबवून पाहणी केली असता त्यात निर्दयतेने कोंबलेल्या अवस्थेत मोठ्या संख्येने जनावरे आढळून आली. पोलिसांनी जनावरे वाहतुकीसंदर्भात कंटेनर चालकासह वाहनातील व्यक्तीना विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नव्हती. त्यानंतर पोलिसांनी साहीद सहजाद खान, बिलाल अहमद अब्दुल गप्पार कुरेशी, मुबारक गफूर खान, तसेच आरीफ युसूफ कुरेशी आणि समशान बशीर अहमद यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जनावरांची अवैध वाहतूक करण्यासाठी वापरलेला कंटेनर आणि कंटेनरमधील २० जनावरे जप्त करण्यात आली. अधिकची माहिती पोलिसांनी जाणून घेतली असता ही जनावरे अवैधरीत्या कत्तलीसाठी पालघाट केरळ येथे नेली जात असल्याचे पुढे आले. ही कारवाई ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनात अमित नाईक, सचिन सूरकार, निखिल कोरडे, शुभम पोहाणे यांनी केली.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी