पशुपालन, दुग्धउत्पादनाचा जोडधंदा शेतकऱ्यांसाठी गरजेचा

By Admin | Updated: February 28, 2017 01:10 IST2017-02-28T01:10:01+5:302017-02-28T01:10:01+5:30

विदर्भातील शेतकरी मेहनती, कष्टाळू आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या मेहनतीवर कधी-कधी पाणी फिरते; ...

Animal Husbandry and Dairying | पशुपालन, दुग्धउत्पादनाचा जोडधंदा शेतकऱ्यांसाठी गरजेचा

पशुपालन, दुग्धउत्पादनाचा जोडधंदा शेतकऱ्यांसाठी गरजेचा

रामदास तडस : तालुका पशुप्रदर्शनी पशुपालकांसाठी ठरली पर्वणीं
पुलगाव : विदर्भातील शेतकरी मेहनती, कष्टाळू आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या मेहनतीवर कधी-कधी पाणी फिरते; पण शेतकऱ्यांसाठी शासनाने अनेक कल्याणकारी योजना आखल्या आहेत. त्याचा फायदा घेत शेतीसोबतच पशुपालन व दुग्धव्यवसाय करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
पुलगाव येथे आयोजित तालुका पशुप्रदर्शनीच्या समारोप कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या देवळी पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडून तालुकास्तरीय पशुप्रदर्शनीचे आयोजन पुलगाव येथे करण्यात आले. प्रदर्शनीच्या अध्यक्षस्थानी कृषी सभापती श्यामलता अग्रवाल होत्या. याप्रसंगी पुलगावच्या पशुसंवर्धन चिकित्सालयातील चाराबागेचे लोकार्पण अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मंचावर अतिथीसह नाचणगावचे नवनिर्वाचित जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, गौळ जि.प. सदस्य मयुरी मसराम, सरपंच सविता गावंडे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. राज भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, तालुका अधिकारी डॉ. संजय खोपडे, नितीन बडगे, दीपक फुलकरी, अमीत राजपूत, डॉ. कडू इत्यादी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन धर्मेंद्र अंबादे, डॉ. थुल यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. राजू यांनी केले.
या पशुप्रदर्शनात २६० गायी म्हशी व १०५ शेळ्यांचा सहभाग होता. या प्रदर्शनीच्या संकरीत देशी गाई, म्हशी, शेळ्या, वळू अशा विविध गटात पारितोषिक देण्यात आले. विविध गटात अनुप ढोमणे, अनील बिरे, समीर गुजर, रणजीत मेंढे, मदन वर्मा, नितीन भालेराव, महेश बोबडे, सतीश पेंढार, अनिरूध्द गायकवाड, आंबटकर, प्रतिक घोडे, राहुल डफडे, देविदास पवार, दिलीप राऊत, प्रवीण पवार, अनील माळोदे, शेख अन्वर, पुरुषोत्तम गाटे, प्रविण बोरसे या पशुपालकांना पारितोषिके देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी पशुपालकांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Animal Husbandry and Dairying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.